23.4 C
Ratnagiri
Thursday, September 19, 2024

विराट कोहली एक हजारी क्लबमध्ये सामील होणार…

यजमान भारत आणि बांगलादेश यांच्यातील 2 सामन्यांच्या...

या दिवशी थिएटरमध्ये फक्त 99 रुपयांमध्ये चित्रपट पहा…

चित्रपट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. 20...

चाकरमान्यांची कोकण रेल्वे, मुंबई-गोवा महामार्गावर गैरसोय

कोकणात सणाच्या निमित्ताने येणाऱ्या जाणाऱ्या चाकरमानी लोकांची...
HomeKhedतज्ज्ञांचा सल्ला ठरला फुसका बार! कशेडी बोगद्यातील गळती थांबेना

तज्ज्ञांचा सल्ला ठरला फुसका बार! कशेडी बोगद्यातील गळती थांबेना

बोगद्यासह संपूर्ण महामार्गाचे काम चुकीचे झाल्याचा आरोप होवू लागला आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यामध्ये गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात गळती सुरू झाली होती. या बोगद्यातून त्यावेळी एकेरी प्रवास करताना बोगद्याच्या दुसऱ्या बाजूला बाहेर येताना गळतीच्या पाण्याने पूर्ण अंघोळ व्हायची. त्यानंतरही या गळतीची पाहणी करून बोगद्यात होणारी गळती थांबविण्याच्या सूचना मंत्र्यांनी दिल्या होत्या. गळती थांबविण्यासाठी तज्ञांनी सूचनाही दिल्या होत्या. या सूचना आणि सल्ले या पावसातही फुसका बार ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. करोडोंच्या खर्चानंतरही कशेडी बोगद्यातील गळती थांबेना, असे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे बोगद्यासह संपूर्ण महामार्गाचे काम चुकीचे झाल्याचा आरोप होवू लागला आहे.

४४१ कोटी खर्चाची निविदा मुंबई-गोवा महामार्गावरील नागमोडी वळणाच्या कशेडी घाटाला पर्यायी चौपदरीकरण कामात बोगदे खोदायचा निर्णय केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने घेतला. त्याकरिता ४४१ कोटी खर्चाची निविदा काढली गेली. ही निविदा रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने स्वीकारली. ३.४१ किलोमीटर लांबीचे दोन बोगदे बुमर तंत्रज्ञानाने खुदाई केलेले आहेत. कशेडी घाटातील एका बाजूला उंच डोंगर आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी तसेच नागमोडी वळणे व घाटातील रस्त्याचे रुंदीकरण अशक्य होते.

बोल्टींक काम झालेच नाही? – घाटामधील ११ किलोमीटरचे अंतर ३.४१ किलोमीटरवर आणण्यासाठी ४४१ कोटींचा निधी खर्च केला आहे. दोन भुयारी रस्ते तयार करताना बोगद्यातील कामात बोल्टीक करून अत्याधुनिक पद्धतीने तंत्रज्ञान वापरून जे काम होणे गरजेचे होते, असे काम झालेले दिसत नाही. गेल्यावर्षी गणपती सणाच्या वेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी बोगद्याचे काम अर्धवट असतानाही बोगद्यातील एक लेन सुरू करण्याची सूचना राष्ट्रीय महामार्ग विभागाला केली होती. त्याप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाने घाईगडबडीत मंत्र्यांचे आदेश मानून हा बोगदा एकतर्फी सुरू केला असा आरोप उघडपणे नागरिक करत आहेत.

त्यानंतर बोगद्याच्या दोन्ही मार्गिका टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आल्या. निविदेप्रमाणे काम पूर्ण झाले पाहणी कार्यक्रम केलेले आहे. मात्र, नसल्याची ओरड सध्या वाहतूकदार चालक-मालक करत आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केवळ कोकणातील रस्त्यांची वरचेवर पाहणी करण्याचा कार्यक्रम गेल्या काही वर्षांपासून सुरू केला आहे. त्यांनी कशेडीतील भुयारी मार्गाची अनेक वेळा तपासणी केली आणि पाहणी केली, परंतु कोणतीही सूचना त्यांना खात्याला करता आली नाही, हे दुर्दैव आहे अशीं प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular