30 C
Ratnagiri
Friday, May 9, 2025

रत्नागिरी लोहमार्ग पोलिस ठाण्यांना कुलूप

कोकणरेल्वे मार्गावरील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कोकण रेल्वेच्या...

वाशिष्ठीतील गाळासाठी ७० जणांचे अर्ज – स्वखर्चाने वाहतूक

चिपळूण शहरांमध्ये पुराचे पाणी भरते त्याला वाशिष्ठी...

जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांना बदल्यांचे वेध

जिल्हा परिषद व पंचायत झालेल्या अधिकारी, कर्मचान्यांना...
HomeRajapurराजापूर पोलीस स्थानकात मध्यरात्री बिबट्या शिरला

राजापूर पोलीस स्थानकात मध्यरात्री बिबट्या शिरला

कुत्र्यांचा पाठलाग करत बिबट्या अचानक पोलिस स्थानकात शिरला.

कुत्र्यांचा पाठलाग करत असलेला बिबट्या मध्यरात्री थेट राजापूर पोलीस स्थानकात घुसल्याने अनेकांची भंबेरी उडाली. मात्र कुत्र्याची शिकार करुन हा बिबट्या मागच्या दाराने स्वतःहून पसार झाल्याने साऱ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला. बुधवारी मध्यरात्री राजापूर पोलीस स्थानकात घडलेला हा थरारक प्रसंग सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. हा बिबट्या एका कुत्र्याला उचलून नेत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसते आहे. तहसीलदार कार्यालय व पोलिस स्थानकाच्या व्हरांड्यात बिबट्याचा मुक्त संचार पाहून भीतीचे वातावरण पसरले आहे.

पोलीस स्थानकात बिबट्या – राजापूर पोलिस स्थानकाच्या आवारात बुधवारी रात्री काही भटके कुत्रे फिरत होते. या कुत्र्यांचा पाठलाग करत बिबट्या अचानक पोलिस स्थानकाच्या मागील बाजूने आत शिरला. सुरुवातीला तो बिथरला आजूबाजूला कुणी नसल्याचा अंदाज घेऊन तो पुढे सरकला. बिबट्या येताच कुत्र्यांनी पळ काढला, त्यातील एक कुत्रा थेट पोलिस स्थानकातच शिरले. बिबट्याने पोलिस स्थानकात शिरून एका कुत्र्याला पकडले, या कुत्र्याला पकडून बिबट्या तुरुंगाच्या दिशेनें असणाऱ्या पाण्याच्या टाकीच्या बाजूने पसार झाला. हा संपूर्ण प्रकार पोलिस स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान, या प्रकारामुळे भितीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे.

RELATED ARTICLES

Most Popular