27.9 C
Ratnagiri
Thursday, June 13, 2024

पाकिस्तान सामना न खेळताच T20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडणार….

आधीच संकटात सापडलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघावर संकट...

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस सोडणार

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी वारकरी दरवर्षी 'विठू नामाचा...

शैक्षणिक साहित्याच्या दरात पंधरा टक्क्यांनी वाढ

शहरी व ग्रामीण भागातील शाळा सुरू होण्यासाठी...
HomeRatnagiriगुहागरातील विवाहितेचा छळ करणाऱ्या सासू, जाऊ आणि नणंदेला १० वर्षे सक्तमजुरी

गुहागरातील विवाहितेचा छळ करणाऱ्या सासू, जाऊ आणि नणंदेला १० वर्षे सक्तमजुरी

सततच्या त्रासाला कंटाळून अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून आत्महत्येचा प्रयत्न केला.

गुहागर तालुक्यातील असगोली खारवीवाडी येथील विवाहितेचा तब्बल ११ वर्षे छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी येथील अतिरिक्त सत्र जिल्हा न्यायाधिश डॉ. अनिता एस.. नेवसे यांनी ३ महिलांना १० वर्षे सक्त मजुरी व प्रत्येकी ८ हजारा रूपये दंड अशी शिक्षा गुरुवारी ठोठावली. यामध्ये विवाहितेची सासू हिर मधूकर नाटेकर, जाऊ प्रतिभा नितीन नाटेकर व नणंद पुष्पा रत्नाकर जांभारक या महिलांचा समावेश आहे. सप्टेंब २०१७ मध्ये ही घटना घडली होती या प्रकरणात मयत विवाहीत महिलेच मृत्यूपूर्व जबाब आणि नवन्यासहीत ९ जणांची साक्ष महत्वाची ठरली.

असगोली खारवीवाडी येथे १४ सप्टेंबर २०१७ रोजी विवाहीता के, आरती मंगेश नाटेकर हिने स्वतः ला पेटवून आत्महत्या केली होती. त्यावेळी त्यांच्या लग्नाला सुमारे ११ वर्षांचा कालावधी झाला होता. तिला निल नावाचा दहा वर्षाचा मुलगा आहे. पती मंगेश मधुकर नाटेकर हा मुंबई येथे मासेमारीचा व्यवसाय करतो. सासू, जाऊ आणि नणंद या तिघींनी आरती नाटेकर हिचा वारंवार छळ करीत तिला सातत्याने घर सोडून जाण्यासाठी प्रवृत्त केले जात होते. तिचा वेळोवेळी शारिरीक व मानसिक छळही केला जात होता. अखेर आत्महत्या या सततच्या त्रासाला कंटाळून आरती मंगेश नाटेकर हिने अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून आत्महत्येचा प्रयत्न केला, यामध्ये ती ९५ टक्के भाजली होती.

तातडीने तिला सरकारी दवाखान्यात नेण्यात आले, यावेळी तिने या तिघींविरुद्ध तक्रार दिली होती. त्यानुसार त्यांच्याविरुद्ध ४९८ (अ), व ५०४ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. आरती रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असतानाच मृत्यू पावली. या प्रकरणी ३०६ हे वाढीव कलम लावून हा खटला चिपळूण जिल्हा न्यायालयामध्ये सुरू होता. सरकार पक्षातर्फे अॅड. प्रफुल्ल साळवी यांनी एकूण ९ साक्षीदार तपासले. खटल्यातील मृत्यूपूर्व जबाब आत्महत्येस प्रवृत्त करणे व छळ याबाबी सिद्ध करण्यासाठी विविध न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर केले.

सर्व साक्षीपुरावे व सरकारी पक्षाचा युक्तिवाद तसेच आरतीच्या नवऱ्याने सत्याची बाजू मांडत आपली आई, बहिण व भावजय यांचेविरूध्द दिलेली साक्ष ग्राह्य मानण्यात आली, त्याप्रमाणे जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी तिनही महिलांना दोषी ठरवून कलम ३०६ अन्वये १० वर्षे सक्तमजूरी व ५ हजार रूपये दंड, कलम ४९८ (अ) गुन्ह्यासाठी ३ वर्षे – सक्तमजूरी व प्रत्येकी २ हजार रूपये दंड, ५०४ गुन्ह्यासाठी २ वर्षे साधा कारावास व १ हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली. या गुन्ह्याचा पोलिस उपनिरीक्षक दिलीप जाधव यांनी केला. पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रदीप भंडारी यांनी सरकार पक्षास मदत केली.

RELATED ARTICLES

Most Popular