25.1 C
Ratnagiri
Wednesday, September 18, 2024

परप्रांतीय हायस्पिड ट्रॉलरच्या घुसघोरीला चाप – मत्स्य विभाग

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी हद्दीमध्ये मोठ्या...

पूर नियंत्रणासाठी लवकरच बैठक – खासदार नारायण राणे

चिपळुणातील पूर नियंत्रणावर मोठे काम करायचे आहे....

रत्नागिरी रेल्वेस्थानकाचे बदलतेय रूपडे…

कोकण रेल्वेमार्गावरील प्रमुख रेल्वेस्थानकांचे रूपडे बदलत आहे....
HomeRatnagiriमुख्यमंत्र्यांचा कोकणचा झंझावती दौरा

मुख्यमंत्र्यांचा कोकणचा झंझावती दौरा

वादळाचा चांगलाच फटका बसलेल्या सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन्ही जिल्हयांचा पहाणी दौरा करण्यासाठी मुख्यमंत्री एक दिवसाच्या कोकण दौऱ्यावर आहेत.

१६ ते १७ मे दरम्यान कोकण किनारपट्टी सह इतर ठिकाणी तौक्ते चक्रीवादळाने चांगलाच दणका दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थानिक आमदार, मुख्य सचिव तसेच मदत व पुनर्वसन सचिवांकडून समुद्र किनाऱ्यांलगतच्या जिल्ह्यांमधील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तौक्ते वादळाचा संभाव्य धोका लक्षात घेता, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्य़ातील एकूण १२ हजार ४२० नागरिकांचे पूर्वनियोजित पणे सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यात आले आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्राप्त झालेली आहे. मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांना आधीच त्या त्या भागानुसार अलर्ट करून इशारा देण्यात आला होता. नागरिकांच्या संरक्षणासाठी, बचाव व मदत कार्यासाठी संबंधित जिल्हा व राज्य प्रशासनाने संपूर्ण तयारी ठेवली होती. रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तौक्ते चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात घरांची, झाडांची पडझड होऊन नुकसान झालं आहे. त्याचप्रमाणे मत्स्य व्यावसायिकांच्या जहाजांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात वादळामुळे नुकसान झाले आहे.

आज २१ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर तौक्ते वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या भागाची पाहणी करण्याकरिता तसेच जनतेची विचारपूस करण्याकरिता येणार आहेत. सर्व भागात झालेल्या नुकसानीची पाहणी करुन त्याप्रमाणे जिल्हा प्रशासनाकडून येणारा रिपोर्ट याचा आढावा घेऊन सर्वतोपरी मदत करणार आहेत. दरम्यान, जिल्हा शासनाकडून आलेला अहवाल पाहून, यावेळी ते कोणती आणि किती मदत जाहीर करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज रत्नागिरीला भेट दिली. वादळाचा चांगलाच फटका बसलेल्या सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन्ही जिल्हयांचा पहाणी दौरा करण्यासाठी मुख्यमंत्री एक दिवसाच्या कोकण दौऱ्यावर आहेत. रत्नागिरी येथील बैठकीने याची सुरुवात झाली. येथे तौक्ते चक्रीवादळाने नेमके किती नुकसान झाले याबाबतचे पंचनामे पूर्ण झाल्यावर, संपूर्ण आढावा घेऊन परिपूर्ण सहकार्य करण्याचे जाहीर केले आहे. कुणीही मदतीपासून वंचित राहणार नाही असे प्रतिपादन त्यांनी रत्नागिरीमधील आढावा बैठकीमध्ये केले. जिल्हयातील ५ तालुक्यामध्ये तौक्ते चक्रीवादळाने झोडपून काढल्याने मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये अधिक नुकसान हे राजापूर व रत्नागिरी तालुक्यामध्ये झालेले दिसून आले आहे.

कोकण म्हणजे फळ झाडांनी समृद्ध भाग. जिल्हयामध्ये चक्रीवादळाने आंबा, काजू, पोफळी, नारळाच्या बागांचे मोठया प्रमाणावर नुकसान केले आहे. या पार्श्वभूमीवर योग्य पध्दतीने आणि वेळेवर पंचनामा करुन प्रमाणित आकडेवारीसह प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्रयांनी या बैठकीनंतर महसूल अधिकाऱ्यांशी बोलताना दिले. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जिल्हयात एकूण झालेल्या नुकसानीबाबत सादरीकरण केले. या चक्रीवादळामध्ये जिल्हयात २ जणांचा मृत्यू ओढावला असून ८ व्यक्ती जखमी झाल्या आहेत. तसेच मृत पावलेल्या पशुधनाची संख्या ११ इतकी आहे.

विद्युत वितरण कंपनीला चक्रीवादळाचा सर्वाधित फटका बसला आहे. अजूनही काही ठिकाणी वीज आलेली नाही. वादळाचे २ दिवस विजेचा लपंडावचं सुरु होता. एवढ्या कठीण वादळाच्या प्रसंगी सुद्धा विद्युत कर्मचारी आपल्या जीवाची परवा न करता विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यामध्ये गुंतले आहेत. वीज खांबाचेही मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. कोकण किनारपट्टी, तळकोकणा मध्ये मत्स्य व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. जिल्हयातील समुद्रकिनाऱ्यावर आश्रयास आलेल्या बोटींना चक्रीवादळाचा चांगलाच दणका बसला असून ३ बोटी पूर्णत: तर ६५ बोटींचे अशंत: नुकसान झाले. ७१ जाळयांचेही नुकसान झालेले आहे. अंदाजे नुकसान ९० लाख रुपयांपर्यंत झाले असल्याचे समोर आले आहे.

विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील तीन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आले आहेत. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तौक्ते चक्रीवादळामुळे किती प्रमाणात नुकसान झालं आहे त्याचा आढावा ते घेत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular