25.9 C
Ratnagiri
Friday, March 29, 2024

कातकरी कुटुंबीयांसाठी ‘शासन आपल्या दारी’

चिपळूण तालुक्यात वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या; परंतु अधिकृत...

चिपळुणातील वृद्ध महिलेच्या खुनाला वाचा फुटली

वालोपे येथे झालेल्या वृद्ध महिलेच्या खुनाला अखेर...

किरण सामंतांनी घेतले ना. नारायण राणेंचे आशीर्वाद…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते...
HomeRatnagiriलायन्स क्लबच्या माध्यमातून अद्ययावत सेंटर होणार सुरु

लायन्स क्लबच्या माध्यमातून अद्ययावत सेंटर होणार सुरु

लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे ९ सप्टेंबरपासून सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्त हे उपक्रम राबविण्यात येणार आहे 

लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे रक्तपेढी, नव्या इमारतीमध्ये आय ओपीडी, डायलिसिस सेंटर आणि फिजिओथेरपी सेंटर सुरू करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात  पुढील दोन वर्षांत रेटिनाविषयक सर्व सुविधा रुग्णालयात उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. तसेच शासनाच्या परवानगी नंतर राजीव गांधी जीवनदायिनी योजनेतून रेटिनाच्या मोफत शस्त्रक्रियासुद्धा करण्यात येतील. कायमस्वरूपी प्रकल्प म्हणून आयलॅंड विकसित करणे, लायन्स स्मरणिका प्रकाशित करणार असल्याचे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. संतोष बेडेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे ९ सप्टेंबरपासून सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्त हे उपक्रम राबविण्यात येणार आहे

लायन्स क्लबतर्फे नेत्र रुग्णालयाशेजारील जागा घेण्यात आली असून येथे नवी इमारत उभारण्यात येणार आहे. नव्या इमारत व प्रकल्पासाठी दीड ते दोन कोटी रुपयांची गरज आहे. दानशूरांच्या मदतीने यंदा हा प्रकल्प सुरू करण्यावर भर आहे. येथे चष्मे बनवण्याची फॅक्टरी, फार्मसी शॉप, डॉक्टर्स केबिन, ऑप्टीकल शॉप सुरू करण्यात येणार आहे. १३ जानेवारीला लायन्स चार्टर्ड डे निमित्त ५० वर्षांचा आढावा घेणारी स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार आहे, अशी माहितीही डॉ. बेडेकर यांनी दिली. मांडवी, रेल्वेस्टेशन या भागात आयलॅंड उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

या पत्रकार परिषदेला डॉ. शैलेंद्र भोळे, लायन्स क्लब अध्यक्ष प्रवीण जैन, पराग पानवलकर, ओंकार फडके, विशाल ढोकळे, सुधीर वणजू, डॉ. रमेश चव्हाण, सुनील देसाई, दत्तप्रसाद कुलकर्णी आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular