28.6 C
Ratnagiri
Sunday, December 3, 2023

कोकणात पंधरा टक्के हापूस कलमांना मोहोर

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ८५ टक्के झाडांना...

…त्या अधिकारी, सुरक्षा रक्षकांना निलंबित करा, शाश्वत मच्छीमार हक्क संघाची मागणी

दापोली तालुक्यात दाभोळच्या सक्षम् परवाना अधिकारी दीप्ती...

चिपळुणातील कोसळलेले गर्डर हटवण्याच्या हालचाली सुरू

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथील कोसळलेल्या उड्डाणपुल...
HomeKhedलोटे एमआयडीसी परिसरामध्ये रसायनाची पाईप फुटली, सर्वत्र धुराचे लोट

लोटे एमआयडीसी परिसरामध्ये रसायनाची पाईप फुटली, सर्वत्र धुराचे लोट

पुष्कर केमिकल्स अँड फर्टिलायझर्स कंपनीचे युनिट नंबर ५ मध्ये आज सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास वायूगळतीने एकच गोंधळ उडाला

लोटे परशुराम येथील एमआयडीसी परिसरामध्ये मागील वर्षापासून अनेक दुर्घटना घडत आहेत. अनेक दुर्घटनांमध्ये काही कामगार देखील दगावले आहेत. अशा घटना कालांतराने वारंवार घडू लागल्याने परिसरातील नागरिक चिंतेत पडले आहेत.

तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील पुष्कर केमिकल्स अँड फर्टिलायझर्स कंपनीचे युनिट नंबर ५ मध्ये आज सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास वायूगळतीने एकच गोंधळ उडाला, मात्र यात कोणीही जखमी झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, येथील पुष्कर केमिकल्स अँड फर्टिलायझर्स कंपनीच्या नव्याने सुरू करण्यात आलेल्या युनिट नंबर पाचमध्ये उत्पादन घेण्याचे काम सुरू असताना दुपारच्या पाळीत सायंकाळी सव्वा सहा वाजता सल्फ्युरिक ऍसिडची पाईप फुटल्याने रसायन हवेच्या संपर्कात आले. दरम्‍यान रसायन हवेत पसरलेल्या धुराने नजीकच्या लोटे तलारीवाडीतील काही नागरिकांना त्रास सहन करावा लागला.

त्यामुळे परिसरामध्ये सर्वत्र धुराचे लोट उसळले. या घटनेने नक्की काय झाले हे काळात नसल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला व घबराट पसरली. कंपनीच्या एका बाजूला असणाऱ्या वस्तीत वायूने शिरकाव केल्याने नागरिकांना डोळे जळजळणे, श्वास गुदमरल्यासारख्या समस्या जाणवू लागल्या. मात्र कंपनीतील कामगार व अधिकाऱ्यांनी प्रसंगावधान राखून वेळीच अपघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे एक तासाच्या प्रयत्नानंतर वायू गळतीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले. सुदैवाने कोणालाही गंभीर इजा झाली नसून कंपनीचे काम पूर्ववत सुरु झाल्याची माहिती कंपनी प्रशासनाकडून मिळत आहे.

लोटे परिसरातील नागरिक या घटनेमुळे धास्तावले. वारंवार होणाऱ्या दुर्घटनांमुळे लोटे व पंचक्रोशीतील नागरिक भयभीत झाले असून पुष्कर कंपनीच्या या नवीन प्लांटमध्ये घडलेल्या या घटनेची चौकशी करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular