26.1 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiriमजगावमध्ये ४५+ वयोगट लसीकरण मोहीम संपन्न

मजगावमध्ये ४५+ वयोगट लसीकरण मोहीम संपन्न

रत्नागिरीमध्ये कोरोना व्हायरस लसीकरण मोहीम वेगाने सुरु आहे. जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण होण्यासाठी विविध योजना राबविण्यात जिल्हा शासन सक्रीय आहे. कोरोनाचा फैलाव ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत वाढलेला दिसत आहे. त्यामुळे गावागावातून उपकेंद्रावर लसीकरण मोहीम राबविण्याकडे स्थानिक स्थरातून मागणी केली जात आहे.

रत्नागिरी मजगाव ग्रामपंचायत येथे ४५ वर्षावरील वयोगटांच्या व्यक्तींचे लसीकरण आयोजित करण्यात आले होते. या मोहिमेसाठी कोविशिल्ड लसीचे १०० डोस पुरविण्यात आले होते. स्थानिक नागरिकांनीही लसीकरणासाठी आवश्यक तेवढी मदत केली. ग्रामपंचायतीतर्फे संपूर्ण नियोजन करण्यात आले होते. सकाळी १० वाजता लसिकारणाला सुरुवात करण्यात आली. लसीकरणासाठी आवश्यक असणारी नोंदणी ग्रामपंचायत मध्ये केली गेली होती, तर प्रत्यक्ष लसीकरण अंगणवाडी केंद्रामध्ये करण्यात आले होते. लस दिल्यानंतर ३० मिनिटे निरीक्षणासाठी थांबवणे शासनाच्या नियमावली मध्ये असल्याने बाजूच्याच इमारतीमध्ये निरीक्षण कक्षाचे नियोजन करण्यात आले होते. लसीकरणासाठी आलेल्या १०० व्यक्तींपैकी कोणालाही कसलाही त्रास जाणवला नाही. त्यामुळे जास्तीत जास्त लसीकरण करून घेण्याकडे जनतेचा कल निर्माण झाला आहे.

लसीकरणासाठी सरपंच फैयाज मुकादम, माजी सरपंच नजराना होडेकर, सर्व ग्रामपंचायत आजी माजी सदस्य ग्रामपंचायत सचिव कुडाळकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष बरकत मुकादम, ग्रामपंचायत कर्मचारी धुळप बंधू, शाखा प्रमुख शाहीद सावकार, मुझफ्फर मुकदम या ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच आरोग्य विभागातील डॉक्टर ढोळे मॅडम सह इतर कर्मचारी पर्यवेक्षक श्रीम. जोशी, देसाई, नागले, कोचरेकर, मोरे, श्री.चव्हाण यांच्या विशेष सहकार्याने मजगाव ग्रामपंचायतीमध्ये आयोजित केलेली लसीकरण मोहिम यशस्वीपणे पार पडली.

RELATED ARTICLES

Most Popular