गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी रेल्वेद्वारे गणपती विशेष गाड्या सोडण्यात येतात. मध्य-पश्चिम रेल्वे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३१२ गणपती विशेष गाड्या चालवणार आहे. यापैकी २१८ गणपती विशेष गाड्यांचे १ लाख ४ हजार चाकरम्यांना कन्फर्म तिकीट मिळाले असल्याची माहिती अलीकडेच रेल्वे प्रशासनाने दिली आहे. मात्र यामध्ये गाडी क्रमांक ०११५५/०११५६ दिवा-चिपळूण गाडी ८ डब्यांची तर ०११५३/ ०११५४ दिवा -रत्नागिरी गाडी १२ डब्यांची आहे. परिणामी प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागतो. यामुळे या दोन्ही गाड्या १६ डब्यांच्या चालवण्यात याव्यात, अशी मागणी कोकण विकास समितीकडून करण्यात आली आहे.
गणेशोत्सवानिमित्त मुंबई, ठाणे, नवी मुंबईतून लाखो चाकरमानी कोकणात जातात. त्यांना रेल्वेचे कन्फर्म मात्र तिकीट मिळवताना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे चाकरमान्यांसाठी दरवर्षी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून गणपती विशेष गाड्या चालविण्यात येतात. गेल्या वर्षी मध्य आणि पश्चिम रेल्वेने २९४ गणपती विशेष ट्रेन चालवल्या होत्या. त्यामध्ये यंदा वाढ करून ही संख्या ३१२ करण्यात आली आहे. ज्यामध्ये मध्य रेल्वेच्या २५७ आणि पश्चिम रेल्वेच्या ५५ गणपती विशेष गाड्यांचा समावेश आहे. यापैकी २१८ आरक्षित गणपती विशेष गाड्यांचे तब्बल १ लाख ४ हजार कन्फर्म तिकिटे चाकरम न्यांना मिळाली आहेत. तर ९४ अनारक्षित स्पेशल गाड्यांम धून दीड लाख प्रवासी कोकणात जाण्याची शक्यता असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.
मात्र यावर्षी नागपूर मडगाव ही नेहमीची गाडी वगळता कल्याणमार्गे एकही गणपती विशेष गाडी सोडलेली नाही. २०२१ पेक्षा यंदा प्रवासी संख्या निश्चितच जास्त असणार आहे. त्यामुळे गणेश चतुर्थी आणि आधीचे तीन दिवस आणि गौरी विसर्जन व पुढचे तीन दिवस या कालावधीत दिवसाला नियमित गाड्या वगळता किमान १२ तेङ्ग १५ जादा गाड्यांचे नियोजन करावे लागणार असल्याचे कोकण विकास समितीचे सदस्य, रेल्वे अभ्यासक अक्षय महापदी यांनी सांगितले. दरम्यान, गाडी क्रमांक १०१०१ / १०१०२ रत्नागिरी मडगाव एक्सप्रेस, नांदेड-पनवेलङ्ग एक्स्प्रेस या गाड्यांचे रेक वापरून सर्व गदींच्या दिवसांत तर दिवा-पेण मेमू शनिवार-रविवारी बंद असतात, ते रेक वापरून दोन आठवड्यांच्या शनिवार-रविवारी आणखी विशेष गाड्या सोडाव्यात अशी मागणी देखील संघटनेने केली आहे.