24.4 C
Ratnagiri
Friday, December 8, 2023

गंजलेल्या खांबावर विद्युत वाहिन्या , मोडकाआगारमधील स्थिती

मोडकाआगर येथील नारळ, सुपारी व काजूच्या बागेतील...

पक्षाच्या कोकणातील नेत्यांना संपवण्याचा विडा – रामदास कदम

कोकणातील पक्षाच्या नेत्यांना संपवण्याचा विडा उद्धव ठाकरे...

श्रमदानातून बंधारे उभारल्याने एक कोटीची बचत – पाणी जिरवा मोहीम

पाण्याची बचत व साठवण केल्यास त्याचे उन्हाळ्यात...
HomeRatnagiriआत्ता रत्नागिरीकरांचे अंतराळ पाहण्याचं स्वप्न होणार साकार

आत्ता रत्नागिरीकरांचे अंतराळ पाहण्याचं स्वप्न होणार साकार

हे पहिलेच तारांगण माळनाका येथे ११ कोटी ५८ लाख रुपये खर्चून उभारले आहे. त्याचे उद्‍घाटन १६ डिसेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

रत्नागिरीकरांचे अंतराळ पाहण्याचं स्वप्न लवकरच सत्यात उतरणार आहे. राज्यातील अ‍ॅक्टिव्ह थ्रीडी असलेले हे पहिलेच तारांगण माळनाका येथे ११ कोटी ५८ लाख रुपये खर्चून उभारले आहे. त्याचे उद्‍घाटन १६ डिसेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. रत्नागिरीत नव्याने विकसित केलेले हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण सज्ज झाले आहे. खगोलीय वस्तूचे प्रत्यक्ष अनुभव देणारे आणि तारांगणाचे गुंग करणारे ३ डी शो पाहायला मिळणार आहेत. यामध्ये ढग, नक्षत्रसमूह आणि आकाशगंगा हे सर्व प्रत्यक्ष आकारमानाच्या स्वरूपात पाहण्याची संधी मिळणार आहे. आधुनिक आणि ऐतिहासिक अवकाशयान, निरीक्षणे, धूमकेतू, लघुगृह आणि अशी बरीच माहिती देणारी डिजिस्टारची शंभरहून अधिक प्रत्यक्षदर्शी मॉडेल्स उपलब्ध आहेत. अत्याधुनिक यंत्रणेमुळे तारांगणातील चित्र सुस्पष्ट दिसणार आहे.

तालुक्यातील माळनाका येथे भव्य तारांगण उभारले आहे. यामध्ये चंद्राचा पृष्ठभागाचे जवळून दर्शन आणि लघुग्रहांची हालचाल हे अनुभवता येणार आहेभारत सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणातील मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून रत्नागिरी पालिकेने तारांगण आणि सायन्स पार्क विकसित केले आहे. या तारांगणातील आधुनिक उपकरणे मुंबईच्या इन्फोव्हिजन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडद्वारे पुरविली आहेत. या कंपनीने अमेरिकेच्या इव्हान्स आणि सदरलँड कॉम्प्युटर कॉर्पोरेशनच्या सहकार्याने भारतात ५० हून अधिक अत्याधुनिक तारांगणांची स्थापना केली आहे. यामध्ये आशियातील पहिले डिजिटल तारांगण, मुंबईतील नेहरू तारांगण, (२००३) आणि पिलिकुला मंगलोर (२०१८) येथील भारतातील पहिले अ‍ॅक्टिव्ह थ्रीडी डिजिटल तारांगण स्वामी विवेकानंद तारांगणाचा समावेश आहे.

रत्नागिरीतील हे तारांगण महाराष्ट्राचे पहिले तर भारतातील पाचवे अ‍ॅक्टिव्ह थ्रीडी तारांगण आहे. हे थ्रीडी म्हणजे डिजिस्टार सेवनची टुडी आणि अ‍ॅक्टिव्ह थ्रीडी प्लेबॅक सॉप्टवेअरने सुसज्ज अशी खगोलशास्त्रीय प्रतिकृती आहे. डिजिस्टारचे हे सॉप्टवेअर अमेरिकेच्या नासाच्या डिजिटल युनिव्हर्समधील डेटा बेसच्या आधारे विकसित केले आहे. तारांगणाचे खेळ मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये आहेत. तसेच प्रत्येक खेळ ३० ते ३५ मिनिटांचा ठेवला जाणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular