28.3 C
Ratnagiri
Wednesday, October 9, 2024

रेल्वे स्थानकांच्या आज लोकार्पण..

राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जिल्ह्यातील रत्नागिरी,...
HomeMaharashtraमनसेच्या तुफानी बॅनरबाजीने परिसरातील वातावरण तणावपूर्ण

मनसेच्या तुफानी बॅनरबाजीने परिसरातील वातावरण तणावपूर्ण

स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना समज द्यावा असेही मनसेने बॅनरमध्ये म्हटलं आहे.

ठाकरे सरकारच्या मशिदीवरील भोंग्यासंबंधीच्या निर्णयाबाबत मनसेने तुफानी पोस्टरबाजी सुरु केली आहे. त्यामध्ये त्यांनी थेट बाळासाहेबांना विनवणी केली आहे. मनसेकडून दादरला शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी करुन ठाकरे बाणा आणि वारसा खऱ्या अर्थाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे चालवताहेत, असे म्हटले आहे. स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना समज द्यावा असेही मनसेने बॅनरमध्ये म्हटलं आहे. या बॅनरबाजीमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण होते.

मनसेच्या बॅनरबाजीवर शिवेसना कशा पद्धतीने प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माननीय बाळासाहेब, बघा आपले सुपुत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिंदू असून हनुमान चालीसा म्हणायला बंदी घालत आहेत,  हिंदूंनी लावलेले भोंगे काढण्याचे आदेश देत आहेत. आपला ठाकरी बाणा आणि वारसा खऱ्या अर्थाने फक्त आणि फक्त राज ठाकरे आता चालवत आहेत. जमल्यास उद्धव ठाकरेंना हिंदू आणि धर्माबाबत सुबुद्धी द्या,अशा आशयाचा बॅनर मनसेकडून शिवसेना भवनासमोर लावण्यात आला आहे. त्यामुळे तेथील वातावरण तणावपूर्ण झाले आहे.

मशिदींवरील भोंगे राज्य सरकारने काढावे अन्यथा मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावण्यात येईल अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली होती. या विषयावरून मनसेने मुंबईतील दादरमधील शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी करत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेला डिवचले आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शांत आहेत.

हिंदुंवर होणाऱ्या अन्यायांविरोधात आता मनसे आणि भाजपकडून आवाज उठवण्यात येत आहे. यामध्ये हिंदू सणांदरम्यान ध्वनी प्रदूषणाचे कारण देत स्पीकर लावण्यावर बंदी घालण्यात येते. परंतु दिवसातून पाच वेळा वाजणाऱ्या मशिदींवरील भोंग्यांवर मात्र कारवाई केली जात नाही. यावरुनच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना समज द्यावी असेही मनसेने बॅनरमध्ये म्हटलं आहे. बाळासाहेब ठाकरेंचे जे हिंदुत्व होते ते बाळासाहेब ठाकरे पुढे नेताना दिसत नाही आहेत असे मनसेचे विभाग प्रमुख यशवंत किल्लेदार यांनी म्हटलं आहे.

RELATED ARTICLES

Most Popular