26.8 C
Ratnagiri
Saturday, December 9, 2023

गंजलेल्या खांबावर विद्युत वाहिन्या , मोडकाआगारमधील स्थिती

मोडकाआगर येथील नारळ, सुपारी व काजूच्या बागेतील...

पक्षाच्या कोकणातील नेत्यांना संपवण्याचा विडा – रामदास कदम

कोकणातील पक्षाच्या नेत्यांना संपवण्याचा विडा उद्धव ठाकरे...

श्रमदानातून बंधारे उभारल्याने एक कोटीची बचत – पाणी जिरवा मोहीम

पाण्याची बचत व साठवण केल्यास त्याचे उन्हाळ्यात...
HomeMaharashtraकाही ठिकाणी मनसेचे ऐक्याचे प्रतिक तर काही ठिकाणी पोलीस बंदोबस्तात हनुमान चालीसा...

काही ठिकाणी मनसेचे ऐक्याचे प्रतिक तर काही ठिकाणी पोलीस बंदोबस्तात हनुमान चालीसा पठण

मनसेच्या आवाहनाला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने यावेळी नागरिकांनी उपस्थिती नोंदवली.

गेल्या काही दिवसापासून भोंग्याबाबत वातावरण चांगलेच तापत आहेत. मनसे पक्षाकडून भोंगे बंद करावे असा इशारा दिला होता. राज्यातील गृह विभागाने मनसेच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांना नोटिसा पाठवत जमावबंदीचे आदेश लागू केले. अनेक मनसैनिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलादपूर शहरातील मनसे सैनिकांनाही नोटीस ब  जावण्यात आली होती. येथील बांधवांनी आम्ही सर्व भारतीय असल्याचे दाखवत ऐक्याचे प्रतिमेला तडा जाणार नाही, याचे भान ठेवत एकमेकांना शुभेच्छा देत भेटी गाठी घेतल्या. आणि या पुढेही नियमांचे पालन करण्यात येईल असे सांगत हिंदू -मुस्लिम ऐक्याचे प्रतिक कायम टिकून राहणार आहे, असा आशावाद मुस्लिम बांधवांनी यावेळी व्यक्त केला.

तर खेड येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अक्षय तृतीया निमित्त मंगळवारी आयोजित करण्यात आलेली महाआरती बुधवारी सायंकाळी ७ वाजता श्री सिद्धिविनायक मंदिर येथे करण्यात आली. यावेळी हनुमान चालीसा पठण करून आरतीला सुरुवात झाली. मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली स्त्री-पुरुष मनसे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसेतर्फे नियोजित महाआरती स्थगित करण्यात आली होती. यानंतर बुधवारी शहरातील श्री सिद्धिविनायक मंदिरासमोर सायंकाळी ७ वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. मनसेच्या आवाहनाला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने यावेळी नागरिकांनी उपस्थिती नोंदवली. महाआरतीला उपस्थित कार्यकर्त्यांनी सुरवातीला ढोल ताशांच्या गजर केला. त्यानंतर हनुमान चालीसा व महाआरती करण्यात आली.

उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकीरण काशीद यांच्या नेतृत्वाखाली यावेळी श्री सिद्धिविनायक मंदिर परिसरात चारही बाजूला शेकडो पोलीस, राखीव पोलीस दल, गृहरक्षक दलाचे जवान यांचा बंदोबस्त तैनात करून न्यायालयाच्या दिलेल्या निर्देशानुसार अजाण व नमाज पठण करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular