मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध आणि बिनधास्त अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या अभिनयाने आणि नृत्यानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. नुकताच तिचा आणि अमृता खानविलकरचा चंद्रमुखी सिनेमातील गाण्यावरील डान्सचा व्हिडियो सोशल मिडीयावर व्हायरल झालेला. अतिशय देखण नृत्य तिने अमृताच्या जोडीने केलं आहे. पण सध्या चर्चा तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे होत आहे. प्राजक्तानं नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमधून प्राजक्तानं तिला मिळालेल्या पुरस्काराची माहिती दिली. पुरस्कार सोहळ्यातील फोटो प्राजक्ताने शेअर केले आहेत.
पुरस्कार सोहळ्यातील फोटो शेअर करून त्याला कॅप्शन दिलं, आणि कालच्या शुभमुहूर्तावर “मुंबई- राजभवनात” जाण्याचा योग आला. काल महाराष्ट्राचे राज्यपाल मा. श्री. भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते कला क्षेत्रात उत्कृष्ठ कामाबद्दल ‘कमला रायझिंग स्टार’ पुरस्कार मिळाला. आयोजन समिती आणि राज्यपाल यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. माझ्या काही आवडत्या व्यक्तींसह हा पुरस्कार मिळाला ह्याचा विशेष आनंद. पुरस्कारामुळे आनंदित झालेली प्राजक्ता तेंव्हा व्यक्त झाली. ती म्हणाली प्रेक्षकांच्या प्रेमाचं परिवर्तन अशा पुरस्कारांमध्ये होतं असं मला वाटतं, त्यामुळे सर्व प्रेक्षकांनी दिलेल्या भरभरून प्रेमाचे मनापासून आभार. असच कायम प्रेम आणि आशिर्वाद राहू द्या.
फोटोमध्ये सोबत प्राजक्ताची आई देखील दिसत आहे. प्राजक्ताने तिच्या आईचा आणि अभिनेता आकाश ठोसरचा फोटो शेअर केला आणि त्याबाबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, आई आणि भाऊ या सोहळ्यासाठी खास पुण्याहून आले होते, फोटो काढायचा राहिला, आईने आकाश बरोबर आवर्जून काढला.. चालायचं’. या पुरस्काराने प्राजक्ताने आनंदित होऊन पोस्ट केली आहे.