27.9 C
Ratnagiri
Monday, September 26, 2022

आमदार योगेश कदम यांना मिळणार मंत्रिमंडळात संधी…!

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी शिवसेनेमध्ये झालेल्या उलथापालथी...

खेड तालुक्यातील राज्य पशुसंवर्धन खात्याच्या १७ दवाखान्यांची स्थिती बिकट

राज्यात सध्या जनावरांवर लंपी त्वचा रोगाचा फैलाव...

नवरात्रीचे औचित्य साधून, महिलांसाठी एक खास अभियान

आज २६ सप्टेंबर २०२२ पासून शारदीय नवरात्रीला...
HomeRatnagiriमंडणगड-तिडे-नालासोपारा एसटीची उजव्या भागातील दोन्ही चाके निखळून बाहेर

मंडणगड-तिडे-नालासोपारा एसटीची उजव्या भागातील दोन्ही चाके निखळून बाहेर

एकतर संप आणि कोरोनाच्या काळात गाड्या जागेवरच राहिल्याने आगारातील गाड्यांची अवस्था, तुटलेल्या खिडक्या, मोडलेल्या, फाटलेल्या सिट, गळणारी छप्पर अशी झाली आहे.

मंडणगड आगाराच्या लांब पल्ल्याच्या व स्थानिक मार्गावर धावणाऱ्या गाड्या प्रवासादरम्यान अचानक  बंद पडण्याच्या घटना वारंवार घडताना निदर्शनास येत आहेत. एकतर संप आणि कोरोनाच्या काळात गाड्या जागेवरच राहिल्याने आगारातील गाड्यांची अवस्था, तुटलेल्या खिडक्या, मोडलेल्या, फाटलेल्या सिट, गळणारी छप्पर अशी झाली आहे. गाड्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे व्यवस्थापनाचे पूर्णत: दुर्लक्ष करण्यात आल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

लांब पल्ल्याच्या मार्गावरही अतिशय जुन्या गाड्या पाठवत असल्याने या गाड्यांमध्ये अनेक समस्या निर्माण होत असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. बसस्थानकाच्या देखील समस्याकडेही कित्येक वर्षे कानाडोळा केले जात आहे. वारंवार तक्रार करून देखील बसस्थानकातील खड्डे अद्याप बुजवण्यात आलेले नाहीत.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून धावणाऱ्या मंडणगड-तिडे-नालासोपारा या एसटीची मागील बाजूच्या उजव्या भागातील दोन्ही चाके निखळून बाहेर पडली. ही घटना ३ ऑगस्टला महाड तालुक्यातील केंबुर्ली गावानजीक घडली. यामध्ये कोणालाही गंभीर दुखापत झाली नसली तरी, मात्र गाड्याच्या अशा येणाऱ्या समस्या आणि सतत बंद पडण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने मंडणगड आगाराच्या निष्काळजीपणावर प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

या आधीही लांब पल्ल्याच्या गाडीची चाके निखळण्याचा प्रकार झाला आहे;  मात्र यातून आगार व्यवस्थापनाने कोणताही बोध घेतला नसल्याची दिसून येत असल्याची गंभीर प्रतिक्रिया प्रवाशांमधून उमटत आहे. आणि अशा प्रकारच्या घटना वांरवार घडत असल्याचे सिद्ध होत असताना व्यवस्थापनाच्यादृष्टीने या घटनांचे कोणेत्याही प्रकारे गांभीर्य असल्याचे दिसून येत नाही. प्रवाशांच्या जीवितांची सुरक्षा आगार व्यवस्थापनास अजिबात राहिलेली नाही का, असा थेट प्रश्न प्रवाशांतून विचारला जात आहे.

बसस्थानकामधील स्वच्छतागृहाची दुरावस्थेची समस्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. मागील दोन वर्षापासून बसस्थानकाच्या इमारतीला लागलेली गळती रोखण्यासाठी प्लास्टिक कागद टाकण्यात आला आहे. तो काढुन छताची दुरुस्ती कऱण्याची तसदी देखील या दोन वर्षात घेण्यात आलेली नाही. हा कागद वाऱ्याने वारंवार उडत असल्याने छताची गळती थांबलेली नाही. गणेशोत्सवापूर्वी बसस्थानकाच्या समस्यांवर आगार व्यवस्थापनाने उपाय शोधावेत, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular