कोरोना आजाराबद्दल रोज काही ना काही तरी नवीन ऐकायला येतचं असते. कधी नवीन जन्मलेल्या बाळाने कोरोनावर केलेली मात केली किंवा काही वेळेला अगदी शंभरी पार केलेले आजी आजोबा सुद्धा यशस्वीरीत्या कोरोनावर मात करताना दिसतात. आणि त्यामुळे एक प्रकारची सकारात्मकता सगळीकडे पसरते. आज आपण अशाच एका ८५ वर्षाच्या आज्जीची कोरोना कहाणी जाणून घेणार आहोत.
मंडणगड मधील कारविणकर कुटुंब अचानक पॉझिटीव्ह आल्याने यंत्रणा हादरून गेली. त्या कुटुंबामध्ये एक ८५ वर्षाच्या आज्जी सुद्धा आहेत. कुटुंबातील सहा जण एकत्रित पॉझिटीव्ह आल्याने कुटुंबामध्ये सुद्धा भीती निर्माण झाली. लक्षणे दिसल्यावर सर्व कुटुंबाने प्रथम डॉक्टरकडे जाऊन टेस्ट करून घेतली. त्यामध्ये सर्व कुटुंबची लक्षणे कोरोनाची असल्याचे रिपोर्ट मध्ये आले. परंतु अशा वेळी घाबरून न जाता , एकजुटीने, धैर्याने आणि एकमेकांना साथ देऊन या कोरोनाचे उच्चाटण करायचा निर्णय या कुटुंबाने घेतला. त्यानुसार वैद्यकीय उपचार सुरु करून योग्य रीतीने आहार, विश्रांती घेऊन या सर्व कुटुंबाने कोरोनावर यशस्वीपणे मात केली.
कोरोनाचा अनुभव कथन करताना मंडणगड पणदेरी येथील दुकान व्यावसायिक असलेले फारूक कारवीणकर यांनी सांगितले कि, कोरोनाची जी सौम्य लक्षणे आहेत, जसे कि, खोकला, अंगदुखी, ताप, सर्दी, वास न येते, चा न लागणे ही एक एक करून सर्वाना जाणवू लागली. परंतु, जगभरातील आजाराची भीषणता लक्षात घेता, आजार अंगावर न काढता वेळीच डॉक्टर कडे जाऊन टेस्ट करून घेऊन उपचार घेण्यास सुरुवात केली. माणूस मनाने खंबीर राहिला तर, कोणत्याही आजारातून बरा होऊन बाहेर पडू शकतो. एकमेकाना धीर देत, सांभाळत आम्ही सर्वांनी विशेषत: माझ्या ८५ वर्षीय आईने मिळून कोरोनावर मात केली.