27.9 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

इंजिनमध्ये बिघाड; तुतारी एक्सप्रेस कणकवली रेल्वे स्थानकात थांबली

मुंबईहून मडगावच्या दिशेने जाणाऱ्या तुतारी एक्सप्रेसचे इंजिन...

जिल्ह्यातील ६०० ठेकेदारांची ८०० कोटी रूपयांची बिले थकली

राज्यातील सर्व विभागाकडील कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता,...

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...
HomeRatnagiriकर्तबगार मंडणगड पोलीस ठाणे अंमलदार संदीप गुजर यांचे निधन

कर्तबगार मंडणगड पोलीस ठाणे अंमलदार संदीप गुजर यांचे निधन

एक चांगला आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व असलेला सहकारी निघून गेल्याची शोकाकुल प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.

मंडणगड पोलीस ठाणे अंमलदार म्हणून संदीप गुजर यांनी रात्रभर ड्युटी बजावली. सकाळी ड्युटी संपवून ८ वाजण्याच्या सुमारास ते घरी आले. त्यांनी नाश्ता केला. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने, तात्काळ घरच्या मंडळीनी त्यांना श्रद्धा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी नेले, पण दुर्दैवाने तत्पूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.

रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात कर्तव्य बजावत असताना पोलीस हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. संदीप गुजर यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ते ४८ वर्षांचे होते. संदीप गुजर यांनी पोलीस विभागात तब्बल तेवीस वर्षे सेवा बजावली होती. वर्षभरापूर्वीच संदीप गुजर यांची मंडणगड पोलीस ठाण्यात बदली झाली होती. त्यांच्या अशा अचानक निधनाने अनेकांना धक्का बसला आहे.

पोलीस हवालदार असलेले संदीप गुजर हे अत्यंत कर्तव्यनिष्ठ, सेवाभावी वृत्तीचे होते. संदीप गुजर हे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील पालवणी येथील होते. मात्र त्यांनी अलिकडे खेड तालुक्यातील गुणदे आवाशी येथे आपल्या आजोळी त्यांनी नवीन वास्तू बांधली होती. एक चांगला आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व असलेला सहकारी निघून गेल्याची शोकाकुल प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.

संदीप गुजर यांच्या पश्चात पश्चात पोलीस खात्यातून निवृत्त झालेल्या मातोश्री, मुंबई पोलीसमध्ये असलेले भाऊ, पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या पत्नी साक्षी गुजर व मुलगा असा मोठा परिवार आहे. संदीप गुजर यांनी घेतलेली एक्झिट अनेकांना चटका लावणारी ठरली.

यापूर्वीही पोलीस कर्मचाऱ्यांचा ड्युटीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. चारच दिवसांपूर्वी ५६ वर्षीय पोलीस उपनिरीक्षक युवराज कृष्णा भालेराव यांचेही हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याचे समोर आले होते.  पोलिसांना कर्तव्य बजावत असताना मृत्यू झाल्याची अलिकडच्या काळातील या परिसरातील ही दुसरी दुर्दैवी घटना आहे. पोलिसांवरती दिवसेंदिवस असलेला वाढता ताण यावर खर्च आता विचार करण्याची वेळ आली आहे, नाहीतर अशा दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular