26.4 C
Ratnagiri
Tuesday, June 24, 2025

रत्नागिरी नगरपरिषदेत सत्ता मिळविण्यासाठी राजकीय डावपेच…

रत्नागिरी नगर परिषद निवडणूकीचे मतलई वारे आता...

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरच्या चौकशीचे आदेश…

खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथे नुकत्याच दहावी...

चिपळूण-कऱ्हाड मार्ग अवजड वाहनांसाठी बंदच…

कोयना ते पाटणदरम्यानच्या पुलाचे बांधकाम सुरू असताना...
HomeRatnagiriवाशिष्ठी मिल्कच्या दूध संकलन केंद्राचा आज खंडाळा येथे शुभारंभ

वाशिष्ठी मिल्कच्या दूध संकलन केंद्राचा आज खंडाळा येथे शुभारंभ

शेतकऱ्यांना दुधाचे बिल दर १० दिवसांनी अदा केले जात असल्याने शेतकरी समाधानी आहेत.

वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टसच्या खंडाळा दूध संकलन केंद्राचा बुधवार दिनांक ८ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता शुभारंभ होणार आहे. जयगड निवळी पशुपालक व शेतकरी बांधवांच्या प्रगतीसाठी जे. एस. डब्ल्यू फाउंडेशन यांच्या सहकार्याने या दूध संकलन केंद्राचा स्वप्नपूर्ती हॉटेल जवळ जयगड रोड खंडाळा येथे होत आहे. वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाची चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक व अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या प्रेरणेतून त्यांच्याच वाढदिनी ७ सप्टेंबर २०२१ रोजी उद्योजक प्रशांत यादव, चिपळूण नागरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांच्या प्रयत्नातून या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.

विशेष म्हणजे हा प्रकल्प अल्पावधीतच शेतकऱ्यांच्या सेवेत रुजू झाला. तर या प्रकल्पाला कोकणवासीयांनी तेवढ्याच तत्परतेने प्रतिसाद दिला आहे. या प्रकल्पाची मालघर, आंबडस, पिंपळी, खेरशेत, दस्तुरी, वेरळ, साडवली, कराड, दापोली, करबुडे या ठिकाणी दूध संकलन केंद्र सुरू झाली असून या केंद्राच्या पंचक्रोशीतील शेतकरी या दूध संकलन केंद्रावर दूध 7 देत आहेत. शेतकऱ्यांना दुधाचे बिल दर 7 १० दिवसांनी अदा केले जात असल्याने शेतकरी समाधानी आहेत. या वाशीष्टी डेअरीच्या एकूण ४७ दूध संकलन केंद्रावर ४८६७ शेतकऱ्यांकडुन दररोज ३१ हजार लिटर दुध संकलित होत आहे. तसेच वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टसच्या दुग्धजन्य पदार्थांना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

तर दुसरीकडे शेतकऱ्यांकडून दूध संकलन केंद्रांची मागणी होत आहे. यानुसार खंडाळा येथे दूध संकलन केंद्राचा शुभारंभ होत आहे. यासाठी जे. एस. डब्ल्यू. फाऊंडेशन यांच्या सहकार्याने अभिनव खंडाळेश्वर शेतकरी शेतीमाल संस्था रत्नागिरी, भूमी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड रत्नागिरी, तालुका आंबा उत्पादक प्रोडूसर यांच्या संयुक्त विद्यमाने दूध संकलन केंद्र सुरू होत आहे. दूध संकलन केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी शेतकरी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टसचे मुख्य संचालक प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular