23.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeChiplunचिपळुणातील मनसेचा बॅनर वादात, कोसळलेल्या पुलाला गडकरींचे नाव

चिपळुणातील मनसेचा बॅनर वादात, कोसळलेल्या पुलाला गडकरींचे नाव

बॅनरवर माय कोकणचा कॅलिफोर्निया करतानाच पडलो' अशा आशयाचे वाक्य होते.

येथील कोसळलेल्या पुलाच्या ठिकाणी मनसेकडून लावण्यात आलेला बॅनर वादात सापडला आहे. बॅनरवर माय कोकणचा कॅलिफोर्निया करतानाच पडलो’ अशा आशयाचे वाक्य होते. तर व्यंगचित्र काढून गडकरी पूल असे मोठ्या अक्षरात लिहण्यात आल्याने पोलिसांनी तात्काळ हा बॅनर काढून टाकला. तसेच याबाबत भाजपने देखील आक्षेप घेऊन कारवाईची मागणी केली आहे. तर पोलिसांनी नगरपालिकेला पत्र देऊन माहिती मागवतानाच तक्रार देण्याची मागणी केली आहे. दरम्यान कोसळलेल्या पुलाला नितीन गडकरींचे नाव देत मनसेने भाजपवर जोरदार हल्लाबोल चढविला आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण बहादूरशेख येथील उड्डाणपूल काम सुरू असतानाच कोसळला. दरम्यान कोसळलेल्या उड्डाणपुलाच्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोठा बॅनर लावला आहे. त्यावर व्यंगचित्र आणि कोकणाचा कॅलिफोर्निया करतानाच पडलो असे वाक्य लिहून गडकरी पूल असेही मोठ्या अक्षरांत लिहण्यात आले होते. हा बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. पोलिसांच्या निदर्शनास हा बॅनर येताच त्यांनी ना. उदय सामंत येथे येण्यापूर्वीच हा बॅनर काढून टाकला.व विनाकारण वाद होणार नाही याची काळजी घेतली होती.

या संदर्भात चिपळूण ठाण्याकडून थेट नगरपालिकेला पत्र पाठवण्यात आले आहे. सदरचा बॅनर कोणी लावला. कोणी परवानगी घेतली होती का? किंवा विनापरवाना हा बॅनर लावण्यात आला होता. या बाबत सविस्तर माहिती पोलिसांनी नगरपालिकेकडून मागवली आहे. तसेच ‘विनापरवाना जर बॅनर लावण्यात आला असेल तर त्याबाबत पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद द्यावी असेही पोलिसांनी चिपळूणनगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना कळवले आहे. त्यामुळे मनसेचा हा बॅनर आता चांगलाच वादात सापडला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular