26.4 C
Ratnagiri
Monday, June 23, 2025

रत्नागिरी नगरपरिषदेत सत्ता मिळविण्यासाठी राजकीय डावपेच…

रत्नागिरी नगर परिषद निवडणूकीचे मतलई वारे आता...

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरच्या चौकशीचे आदेश…

खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथे नुकत्याच दहावी...

चिपळूण-कऱ्हाड मार्ग अवजड वाहनांसाठी बंदच…

कोयना ते पाटणदरम्यानच्या पुलाचे बांधकाम सुरू असताना...
HomeRatnagiriरत्नागिरी रेल्वे स्थानकाला मधु दंडवतेंचे नाव देण्याची मागणी मान्य न झाल्यास...

रत्नागिरी रेल्वे स्थानकाला मधु दंडवतेंचे नाव देण्याची मागणी मान्य न झाल्यास २६ जानेवारीला आंदोलन

प्रा. दंडवते यांचे कोकण रेल्वे निर्माण कार्यात मोठे ऋण आहे.

माजी केंद्रीय मंत्री आणि कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांचे नाव रत्नागिरी रेल्वे स्टेशनला देण्यात यावे या मागणीसह अन्य प्रमुख मागण्यांबाबतचे निवेदन प्रा. मधु दंडवते स्मारक समि तीच्यावतीने कोकण रेल्वेचे मॅनेजिंग डायरेक्टर व चेअरमन यांना सादर करण्यात आले आहे. दरम्यान, २६ जानेवारी २०२४ पर्यंत या मागण्यांबाबत अंमलबजावणी न केल्यास आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व रेल्वे स्थानक या ठिकाणी लाक्षणिक धरणे उपोषण व आंदोलन केले जाईल असा इशारा या समितीच्यावतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनात म्हटले आहे की, माजी केंद्रीय मंत्री व कोकण रेल्वेचे शिल्पकार, प्रा. मधु दंडवते यांचे जन्म शताब्दी वर्ष सुरू आहे.

प्रा. दंडवते यांचे कोकण रेल्वे निर्माण कार्यात मोठे ऋण आहे. त्यामुळे रत्नागिरी रेल्वे स्थानकाला प्रा. मधु दंडवते असे नाव देण्यात यावे. कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानक येथे प्रा. मधु दंडवते यांचे तैलचित्र प्रवेशद्वारावर अथवा प्रवासी बैठक व्यवस्थेच्या जागी भिंतीवर लावण्यात यावे. रत्नागिरी रेल्वे स्थानक ते महामार्ग रस्त्याला प्रा. मधु दंडवते मार्ग असे नाव देण्यात यावे, सावंतवाडी रेल्वे स्थानकाला टर्मिनस म्हणून जाहीर करून कार्यान्वित करावे आणि प्रा. मधु दंडवते यांच्या नावे रेल्वे सुरू करावी किंवा एखाद्या विद्यमान रेल्वे गाडीचे नामांतर करावे अशा मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. हे निवेदन सादर करताना प्रा. मधु दंडवते स्मारक समितीचे चंद्रकांत परवडी, सुनील मानकर, राजेश लांजेकर, नंदकुमार आंबेकर आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular