23.2 C
Ratnagiri
Saturday, January 17, 2026

जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती

कोकणासह जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती मिळाला...

हातखंब्याजवळ अपघात, मोटरची दुचाकीला धडक, दापत्य जखमी

रत्नागिरी ते हातखंबा जाणाऱ्या मार्गावरील खेडशी महालक्ष्मी...

जि.प. निवडणुकांसाठी जिल्ह्यात महायुती शिवसेना-भाजपसोबत राष्ट्रवादीही येणार?

५ फेब्रुवारीला होणारी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी...
HomeKhedमाय-लेकरासह आत्याचा बुडून मृत्यू, वाशिष्ठी नदीचा डोह ठरला काळ

माय-लेकरासह आत्याचा बुडून मृत्यू, वाशिष्ठी नदीचा डोह ठरला काळ

डोहात बुडून तिघांचाही मृत्यू झाला.

तालुक्यातील खडपोली-रामवाडी येथील वाशिष्ठी नदीच्या डोहात बुडून माय-लेकरू व आत्याचा मृत्यू झाला. दुपारी अडीच वाजता ही घटना घडली. तिघांचे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, खडपोली-रामवाडी येथील लता शशिकांत कदम (वय ३५), लक्ष्मण शशिकांत कदम (८) व मुलाची आत्या रेणुका धोंडिराम शिंदे (४५) हे तिघेही खडपोली रामवाडी येथील डोहात कपडे धुण्यासाठी गेले होते. यावेळी लक्ष्मण हा पाण्यात खेळत होता. काही वेळाने तो पाण्यात बुडत असल्याचे त्याची आई लता कदम यांनी पाहिले आणि त्याला वाचवण्यासाठी त्यांनी उडी मारली; मात्र तीही बुडत होती. त्या दोघांना वाचवण्यासाठी रेणुका शिंदे यांनी पाण्यात उडी मारली. मात्र, डोहात बुडून तिघांचाही मृत्यू झाला.

लक्ष्मण ज्या ठिकाणी पाण्यात खेळत होता त्या ठिकाणी पाणी कमी होते; परंतु नंतर तो जास्त पाणी असलेल्या ठिकाणी गेला तेथे त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला. नंतर त्याची आई आणि आत्या बुडाली. ग्रामस्थांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र तो असफल ठरला. घटनेची माहिती समजताच अलोरे- शिरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दादर येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने खडपोली रामवाडी शोकामय झाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular