28.4 C
Ratnagiri
Friday, October 25, 2024
HomeRatnagiriआता सातबारावर दिसणार आईचे नाव भूमी अभिलेख विभागाकडून निर्णय

आता सातबारावर दिसणार आईचे नाव भूमी अभिलेख विभागाकडून निर्णय

तलाठी कार्यालयात शहानिशा केल्यानंतर ही नोंदणी होईल असे सांगण्यात आले आहे.

शाळेच्या दाखल्यासह विविध सरकारी कागदपत्रांमध्ये आईच्या नावाचा समावेिश करण्याचा निर्णय राज्य याआधीच घेतला आहे. आता आणखी एका महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये आईच्या नावांचा समावेश करण्यात येणार आहे. सातबारा उताऱ्यावर अर्जदाराच्या नावानंतर आता त्याच्या आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाकडून घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाने काही महिन्यांपूर्वी महिलांच्या नावाचा अर्थात आईच्या नावाचा समवेश करण्याचा निर्णय घेतला होता.

त्याच अनुषंगाने १ मे २०२४ नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या नावे जम ीन, सदनिका खरेदी केल्यास त्याच्या नावासह आईच्या नावाचा उल्लेख करण्यात येणार आहे. त्या संदर्भात भूमी अभिलेख विभागामार्फत संगणकप्रणाली राबविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, सातबारा उताऱ्यात आईच्या नावासाठी नवा कॉलम तयार केला जात आहे. त्यामुळे पुढील सहा महिन्यांत याची अंमलबजावणी होईल अशी माहिती मिळाली आहे.

त्यासोबत आईचे नाव लावण्यासाठी काही कागदपत्रे गरजेची आहेत. आई असल्याचा पुरावा दिल्यानंतरच आईचे नाव लावता येणार आहे. तसेच तलाठी कार्यालयात शहानिशा केल्यानंतर ही नोंदणी होईल असे सांगण्यात आले आहे. सध्या महिलांची नावे लावताना महिलेचे स्वतःचे नाव, पतीचे नाव आणि आडनाव असा क्रम आहे. मात्र सातबारा उताऱ्यावर आईचे नाव लावताना त्यांचे आधीचे म्हणजे लग्नापूर्वीचे नाव देखील लावण्याची मुभा असणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular