26.9 C
Ratnagiri
Wednesday, July 17, 2024

रत्नागिरी मिरकरवाडा मच्छीमार्केटची दुरवस्था

शहराजवळील मिरकरवाडा येथील मच्छीमार्केटची अवस्था दयनीय झाली...

घनकचरा प्रकल्पाला ५ एकर जागा – उदय सामंत

रत्नागिरी पालिकेचा घनकचरा प्रकल्पाच्या जागेचा प्रश्न अखेर...

परशुरामनगर भागात पुराची नवी समस्या, महामार्ग विभागाचे दुर्लक्ष

ओझरवाडी डोंगरातील पावसाचे पाणी महामार्गच्या गटारांमध्ये न...
HomeRatnagiriपत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर

पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर

जगभरामध्ये उद्भवलेल्या वर्षभरापासूनच्या कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये अगदी देशा विदेशातील विविध प्रकारची इत्यंभूत माहिती आपल्याला पत्रकारांमुळे मिळते. राज्यातील कोरोनाच्या पहिल्या आणि आता सुरु असलेल्या दुसर्या लाटेमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. परंतु, सर्व मिडिया मात्र जनतेला हर तर्हेच्या बातम्या पोहोचविण्यासाठी सक्रीय होती.

या कोरोना काळामध्ये अनेक मिडिया मध्ये काम करणारे पत्रकार, न्यूज रिपोर्टर, कॅमेरामन इत्यादी सोबत असणारा सहकारी वर्ग यांना कामाच्या ठिकाणी कोरोनाची लागण झाली. कोरोना सोबत सह्व्याधी असणाऱ्या कर्मचार्यांना अनेक जटील तब्ब्येतीच्या बाबतीतील समस्यांना तोंड दयावे लागले होते. काही कर्मचार्यांना या महामारीच्या काळात आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे अशा काळामध्ये त्यांच्या आरोग्याची विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे.

रत्नागिरीतील प्राईम डायग्नोस्टीक सेंटर मार्फत खास करून पत्रकारांसाठी मोफत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर दिनांक २८ जून ते १ जुलै या दरम्यान प्राइम डायग्नोस्टिक शिवाजी नगर रत्नागिरी या ठिकाणी होणार आहे. प्राईम डायग्नोस्टीकच्या वतीने कायमच समाजउपयोगी विविध उपक्रम राबविले जात असतात. तरी शहरातील पत्रकारांनी जास्तीत जास्त या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन सेंटरच्या वतीने करण्यात आले आहे.

Free Check UP for Journalist

 

शरीरातील असणाऱ्या काही आजारांची वेळोवेळी तपासणी करणे गरजेचे असते. या मोफत आरोग्य शिबीरांमध्ये सीबीसी, कॅल्शिअम, क्रिएटिन, कोलेस्ट्रोल तसेच रक्तातील साखरेच्या पातळीची तपासणी केली जाणार असल्याचे सेंटरच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या आयोजित शिबीरामध्ये पत्रकारांना तपासणी तसेच आरोग्यविषयक, आजारांबद्दल असणारे काही समज-गैरसमज अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे नक्कीच अनेक आजारांसंबंधीची भीती आणि शंका दूर होण्यास मदत होईल.

RELATED ARTICLES

Most Popular