22.7 C
Ratnagiri
Saturday, December 21, 2024

मंत्री उदय सामंतांचे उद्या होणार जंगी स्वागत…

मंत्री उदय सामंत यांचे रविवारी (ता. २२)...

गुहागरमध्ये मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून २५ जण भाजले

मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून रेडिएटरमधील उकळते, हिरवे...

कुंभार्ली घाटरस्त्याचे काँक्रिटीकरण करा – आमदार शेखर निकम

कुंभार्ली घाटमार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण, पशुसंवर्धन योजनांसाठी संमतीपत्राची...
HomeKhedमुंबई-गोवा महामार्गावर आजपासून ३ दिवस ब्लॉक

मुंबई-गोवा महामार्गावर आजपासून ३ दिवस ब्लॉक

सकाळी ६ ते ८ आणि दुपारी २ ते ४ दोन टप्प्यात हे ब्लॉक घेतले जाणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर गुरुवारपासून सलग ३ दिवस सकाळ आणि दुपारच्या सत्रात ब्लॉक घेतला जाणार आहे. कोलाड जवळील पूई येथे नवीन पूलाचे गर्डर टाकण्याचे काम करण्यासाठी ब्लॉक घेतला जाणार आहे. वाहतुक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी याबाबतची वाहतुक अधिसूचना जारी केली आहे. ११ जुलै ते १३ जुलै असा ३ दिवस हा ब्लॉक घेतला जाणार आहे. सकाळी ६ ते ८ आणि दुपारी २ ते ४ दोन टप्प्यात हे ब्लॉक घेतले जाणार आहे. याकाळात महाम ार्गावरील दोन्ही बाजूची वाहतुक बंद ठेवली जाणार आहे. प्रवाशांना तसेच वाहनचालकांना या काळात पर्यायी मार्गाचा अवलंब करण्यास सांगण्यात आले आहे.

गेल्या १२ वर्षांपासून पळस्पे ते इंदापूर मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. रुंदीकरण पूर्ण झाले असले तरी कासू ते इंदापूर टप्प्यातील पूलांची कामे रखडली आहेत. ही कामे आता मार्गी लावली जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून कोलाड जवळील पूई येथील नवीन पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. या पूलाचे गर्डर टाकण्याचे काम ११ ते १३ जुलै दरम्यान केले जाणार आहे. यासाठी सहा मोठे गर्डर आणण्यात आले आहेत. गर्डर बसविण्यासाठी लागणाऱ्या यंत्रसामुग्रीही पूलाजवळ दाखल झाली आहे. हे काम करतांना वाहतुक बंद ठेवणे गरजेचे असल्याने ठेकेदार तथा महामार्ग विभागामार्फत वाहतुक महासंचालकांकडे वाहतूक बंद ठेवणेबाबत विनंती करण्यात आली होती.

त्यानुसार वाहतुक विभाग अप्पर पोलीस माहसंचालक कार्यालयातील पोलीस अधिक्षक अरविंद साळवे याबाबतची वाहतूक प्रतिबंधात्मक अधिसूचना मंगळवारी रात्री उशीरा जारी केली आहे. या कालावधीत मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार वाकण फाटा येथून भिसे खिंड-रोहा कालाड मार्गे पुन्हा मुंबई-गोवा महाम ार्गावरून मार्गस्थ होता येईल. वाकण फाटा येथून पाली-रनाळजे-कोलाड किंवा पाली-रवाळजे-निजामपुर-म ाणगांव वरून वळवून मुंबई-गोवा महाम ार्गावरून मार्गस्थ होता येईल. खोपोली- पाली-वाकण राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना पाली-रवाळजे- कोलाड किंवा पाली-रवाळजे-निजाम पुर-माणगांव वरून वळवून मुंबई- गोवा महामार्गावरून मार्गस्थ होता येईल.

या कालावधीत गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग देण्यात आला आहे. कोलाड येथून कालाड-रोहा-भिसे खिंड-वाकण फादा किंवा नागोठणे वरून वळवून मुंबई-गोवा महामार्गावरून मार्गस्थ होता येईल. कोलाड येथून रवाळजे- पाली वरून वळवून वाकण-पाली- खोपोली राष्ट्रीय महामार्गावरून मार्गस्थ होता येईल. कोलाड येथून रवाळजे- पाली-वाकण फाटा वरून वळवून मुंबई गोवा महामार्गावरून मार्गस्थ होता येईल. सर्व प्रवाशांनी या कालावधीत पर्यायी मार्ग वापरुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनानी केले आहे..

RELATED ARTICLES

Most Popular