28.9 C
Ratnagiri
Sunday, February 5, 2023

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...

बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन

कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये...

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे...
HomeRatnagiriपालिकेतील १३ सेवानिवृत्त आणि स्वेच्छानिवृत्तांचे ग्रॅच्युइटीचे पैसे मिळण्यास विलंब

पालिकेतील १३ सेवानिवृत्त आणि स्वेच्छानिवृत्तांचे ग्रॅच्युइटीचे पैसे मिळण्यास विलंब

कर्मचाऱ्यांचे हे पैसे देण्यात का विलंब होत आहे, असा सवाल केला जात आहे. हे पैसे मिळावेत यासाठी हे सेवानिवृत्त कर्मचारी पालिकेमध्ये सतरांदा फेऱ्या घालत आहेत.

रत्नागिरी तालुक्यातील गेल्या वर्षभरात पालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या १३ कर्मचाऱ्यांना अद्यापही त्यांच्या ग्रॅच्युइटीचे पैसे मिळालेले नाहीत, तसेच त्यांना पगार रोखीकरणही (अर्जित रजाविक्री) करता आलेली नसल्याचे प्रकरण समोर आले आहे. कर्मचाऱ्यांचे हे पैसे देण्यात का विलंब होत आहे, असा सवाल केला जात आहे. हे पैसे मिळावेत यासाठी हे सेवानिवृत्त कर्मचारी पालिकेमध्ये सतरांदा फेऱ्या घालत आहेत.

सध्या रत्नागिरी पालिकेची आर्थिक परिस्थिती डबघाईला आलेली असून, निवृत्त कर्मचाऱ्यांची थकित देणी भागवण्यासाठी शासनाकडून आलेला निधीही इतरत्र खर्ची पडत असल्याने पालिकेच्या १३ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे २ कोटी रुपये पालिकेकडे थकले आहेत. ग्रॅच्युइटीचे पैसे, पगार रोखीकरणाच्या (अर्जित रजाविक्री) पैशाचा यामध्ये समावेश आहे. महिनाभरात २ कोटी थकित रक्कम न मिळाल्यास संतप्त निवृत्त कर्मचाऱ्यांनी थेट ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

या वर्षभरात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे  पीएफ फंडाचे पैसे प्राप्त झाले असून, सध्या निवृत्तीवेतन सुरू झाले आहे.  मात्र ग्रॅच्युइटी आणि त्यांच्या अर्जित रजेचा विषय अजूनही वर्षभरापासून प्रलंबितच आहे. गेल्या वर्षभरात रस्त्याच्या दुरुस्तीवर झालेल्या लाखो रुपयांच्या खर्चामुळे पालिकेची आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम नवीन विकास कामांवर होत आहे. शिवाय निवृत्त कर्मचाऱ्यांची थकित देणी देण्यासाठी नगर पालिकेकडे पैसेच नसल्याचे सांगून त्यांना वर्षभरापासून असेच टंगवत ठेवल्यामुळे, निवृत्तीनंतर मिळणाऱ्या फायद्यासाठी या कर्मचाऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली आहे.

सुधारित पाणीपुरवठा योजनेसह, रस्ते डागडुजी सारख्या अनेक कामांवर पालिकेला अतिरिक्त खर्च करावा लागला आहे. त्यामुळे पालिकेची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे. शहराअंतर्गत कामांसाठी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांची थकित देणी देण्यासाठी निधीची व्यवस्था करण्याचे मोठे आव्हान पलिकेसमोर उभे राहिले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular