29.1 C
Ratnagiri
Sunday, February 25, 2024

बहुजनांनी ओबीसी झेंड्याखाली एकत्र यावे – चंद्रकांत बावकर

कुणबी समाजासह ओबीसी समाजाच्या विकासासाठी संघटन होण्यासह...

सहा शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार

कृषी, कृषी संलग्न क्षेत्र फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय...

रत्नागिरी ‘लायन्स क्लब’च्या डायलिसिस सेंटरचा प्रारंभ

लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट संचालित यशस्वी नेत्र रुग्णालयानंतर...
HomeDapoliमुरुड येथील सी कौंच रिसोर्ट अखेर जमिनदोस्त

मुरुड येथील सी कौंच रिसोर्ट अखेर जमिनदोस्त

पर्यावरण कायद्याचा भंग करून बांधण्यात आलेले हे रिसोर्ट पाडण्यात आल्याने मुरुड येथे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुरुड येथील समुद्र किनार्यावर पर्यावरण कायद्याचा भंग करून बांधण्यात आलेल्या साई रिसोर्ट विरोधात पर्यावरण मंत्रालयाकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार साई रिसोर्ट पाडून टाकण्याचे आदेश या मंत्रालयाने दिले होते. मात्र साई रिसोर्टचे मालक कदम यांनी मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल करून, राजकीय प्रकरणात गुंतवून उगीचच माझ्या मालमत्तेचे नुकसान करून नका अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे. न्यायालयाने ९ जानेवारीपर्यंत कोणतीही कारवाई करण्यास शासनाने मनाई केली आहे.

मात्र साई रिसोर्ट शेजारी असलेल्या सी कौंच या रिसोर्टचे मालक यांनी शासनाच्या कारवाई विरोधात न्यायालयात धाव न घेतल्याने हे रिसोर्ट पाडून टाकण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा मागविल्या होत्या. दापोली तालुक्यातील मुरुड येथील बहुचर्चित साई रिसोर्टशेजारी असलेल्या सी कौंच रिसोर्ट अखेर जमिनदोस्त करण्यात आले. पर्यावरण कायद्याचा भंग करून बांधण्यात आलेले हे रिसोर्ट पाडण्यात आल्याने मुरुड येथे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबई येथील यश एजन्सीला हे बांधकाम पाडण्याचे काम देण्यात आले होते. त्यांनी बुलडोझरच्या सहाय्याने सी कौंच रिसोर्टची इमारत पाडून टाकण्याचे काम केले असून या इमारतीचा मलबा हटवून तो दुसरीकडे टाकावा लागणार आहे व ही जागा पूर्ववत करून त्यावर झाडे लावण्यात येणार आहेत. ९ जानेवारीला साई रिसोर्टचा फैसला उच्च न्यायालयात होणार असून शासनाच्या बाजूने निकाल लागल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग साई रिसोर्ट पाडण्यासाठी ठेकेदाराला कामाचे आदेश देईल.

RELATED ARTICLES

Most Popular