28.5 C
Ratnagiri
Tuesday, July 8, 2025

कोकणच्या समुद्रात पाकिस्तानची बोट, सर्व यंत्रणा सतर्क

कोकणच्या समुद्रात रविवारी रात्री एक संशयास्पद बोट...

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरांसह बसण्याचा इशारा…

वाटद एमआयडीसीमध्ये कोणते प्रकल्प येणार याबाबत एमआयडीसीची...
HomeKhedकर्जाचे हफ्ते थकल्याने तरुणाची आत्महत्या, कुजलेल्या स्थितीत आढळला मृतदेह

कर्जाचे हफ्ते थकल्याने तरुणाची आत्महत्या, कुजलेल्या स्थितीत आढळला मृतदेह

जवळपास दोन महिनाभरानंतर त्याचा मृतदेह काजूच्या झाडाला लटकलेल्या स्थितीमध्ये आढळला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून होणाऱ्या आत्महत्या चिंतेचे कारण बनले आहे. लहान सहान गोष्टी, हट्ट, प्रेमभंग, कर्ज, अपयश इत्यादी अनेक कारणामुळे आत्महत्या घडत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

खेड तालुक्यातील कळंबणी बुद्रुक येथील ३८ वर्षीय तरुणाने कर्जाचे हफ्ते थकल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महेश कृष्णा हंबीर रा. कळंबणी बु. हंबीरवाडी, खेड असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. २९ सप्टेंबरपासून हा युवक घरातून बेपत्ता झाला होता. जवळपास दोन महिनाभरानंतर त्याचा मृतदेह काजूच्या झाडाला लटकलेल्या स्थितीमध्ये आढळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २६ नोव्हेंबर रोजी महेश याचा भाऊ शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेला असता महेश याची चप्पल दिसली. घाबरलेल्या महेशच्या भावाने तात्काळ या घटनेची माहिती खेड पोलिसांना दिली. त्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

महेश हंबीर याने बँकेतून कर्ज काढून टेम्पो घेतला होता. मात्र बँकेचे कर्जाचे हफ्ते थकीत राहिले होते. यामुळे त्याची मनस्थिती अस्वस्थ झाली होती. याच नैराश्यमूळे महेश २९ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ८ वाजता कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेला होता. कुटुंबियांनी नातेवाईकांकडे शोध घेऊनही तो सापडला नाही. अखेर १७ ऑक्टोबर २०२२ रोजी खेड पोलीस स्थानकात नातेवाईकांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.

दरम्यान, हा मृतदेह ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी महेशच्या भावाने पोलिसांना बेपत्ता महेशची चप्पल दाखवली. त्यानंतर पोलिसांनी या परिसराची पाहणी केली. यावेळी त्याचा मृतदेह काजूच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसला. खूप दिवस झाल्याने मृतदेह कुजला होता. यामुळे दोरीच्या खाली हाडे दिसून आली. तिथेच कपडे, पाकीट, बेल्ट, पॅनकार्ड, टी शर्ट, पॅण्ट, रुमाल आदी वस्तू मिळाल्या. या वस्तूंवरुन तो मृतदेह महेश हंबीरचाच असल्याची खात्री त्याच्या भावाला झाली. नातेवाईकांनी मृतदेह ओळखल्यानंतर पोलिसांनी २६ नोव्हेंबर रोजी खेड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular