29.7 C
Ratnagiri
Sunday, June 16, 2024

इंदवटीतील दोन कुटुंबांचा स्थलांतरास नकार, १८० कुटुंबांना नोटिसा

तालुक्यातील दरडग्रस्त आणि भूस्खलन प्रवणक्षेत्रातील गावातील ग्रामस्थांना...

शाळांच्या परिसरात सीसीटीव्ही बसवा, पोलिस अधीक्षक कुलकर्णी

सर्व शाळांच्या परिसरामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी, तसेच...

चिपळुणात ठाकरेंच्या पाठीशी नवी ताकद

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार...
HomeMaharashtra३१ मार्चपासून राज्यभर महागाईमुक्त भारत आंदोलन सप्ताह

३१ मार्चपासून राज्यभर महागाईमुक्त भारत आंदोलन सप्ताह

केंद्रातील भाजप सरकारला जागे करण्यासाठी ३१ मार्चपासून राज्यभर महागाईमुक्त भारत आंदोलनाचा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती दिली आहे.

दिवसेंदिवस महागाईचा भडका उडत चालला आहे. घरगुती गोष्टींसह, इंधन दरवाढ मोठ्या प्रमाणात होत असल्याने सामान्य जनता या महागाईमध्ये पोळली जात आहे. निवडणुका होईपर्यंत वाढीव दर थोपवून धरून, त्या झाल्यावर मात्र रोज दरामध्ये वाढ होतच आहे. त्याच्या विरोधात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सर्वसामान्यांना त्रस्त करणाऱ्या महागाई विरोधात आवाज बुलंद करत झोपी गेलेल्या केंद्रातील भाजप सरकारला जागे करण्यासाठी ३१ मार्चपासून राज्यभर महागाईमुक्त भारत आंदोलनाचा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती दिली आहे.

मुंबईतील टिळक भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नाना पटोले यांनी या सप्ताहाची माहिती दिली आहे. या पत्रकार परिषदेला अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष एम एम शेख, माजी मंत्री व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसिम खान, माजी मंत्री अनिस अहमद आदी संबंधित उपस्थित होते.

नाना पटोले म्हणाले, भाजपाचा कारभार हा गरज सरो आणि  वैद्य मरो या उक्तीप्रमाणे आहे. निवडणुकीमध्ये जनतेच्या रोषाला सामोरे जायला लागू नये म्हणून त्या कालावधीपुरती इंधन दरवाढ रोखून ठेवण्यात आली. परंतु, निवडणुका संपल्यानंतर लगेचच जनतेवर हर तर्हेने महागाईचा भार टाकण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

मागील आठवड्यामध्ये पेट्रोल आणि डिझेल ३.२० रुपये प्रति लिटर महाग झाले आहे. तर एलपीजी व्यवसायिक गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महाग झाला आहे. सीएनजी, पीएनजी गॅस तसेच खाद्यतेलाचे दर देखील मोठ्या प्रमाणात वाढले असून १ एप्रिलपासून औषधांच्या दरामध्येही चांगलीच वाढ होणार असल्याची त्यांनी माहिती दिली आहे. केंद्रातील मोदी सरकार जनतेला महागाईच्या खाईत लोटताना त्यांना काहीही वाटत नसल्याचे समोर येते आहे.

RELATED ARTICLES

Most Popular