22.4 C
Ratnagiri
Monday, January 30, 2023

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...

बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन

कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये...

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे...
HomeMaharashtraराऊतांची संपूर्ण कुंडली माझ्याकडे आहे, वेळ आल्यावर ती बाहेर काढेन, नारायण राणेंचा...

राऊतांची संपूर्ण कुंडली माझ्याकडे आहे, वेळ आल्यावर ती बाहेर काढेन, नारायण राणेंचा इशारा

मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि आताची शिवसेना यातील फरक सांगून एक प्रकारे हल्लाबोल करायला सुरुवात केली.

मागील आठवडाभरापासून अनेक राजकीय विविध पक्षांची नेते मंडळी पत्रकार परिषद घेऊन एकमेकांवर खरे खोटे आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. १५ फेब्रुवारीला संजय राउत यांनी शिवसेना भवन दादर येथे पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षांवर कडाडून टीका केली. त्यावर प्रत्युत्तर म्हणून भाजपा किरीट सोमय्या यांनी दिल्लीतून त्यांच्यावर टीका केली. त्यानंतर मात्र मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि आताची शिवसेना यातील फरक सांगून एक प्रकारे हल्लाबोल करायला सुरुवात केली.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर सडकून टीका करताना राउतांची संपूर्ण कुंडली माझ्याकडे आहे, वेळ आल्यावर ती बाहेर काढेन असा इशारा दिला आहे. शिवसेनेच्यावतीनं संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली होती,  यामध्ये त्यांनी भाजपच्या अनेक नेत्यांवर आरोप लावले आहेत. राउतांच्या पत्रकार परिषदेला प्रत्यूत्तर देण्यासाठी राणे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली.

राणे म्हणाले,  “संजय राऊत हे शिवसेनेचे नाहीतच, तर ते संपूर्ण राष्ट्रवादीचे आहेत. संजय राऊतांना राष्ट्रवादीकडून सुपारी मिळाली आहे की ठाकरेंना अटक झाल्यानंतर तुम्हालाच त्यांच्या पदावर बसवण्यात येणार आहे. कारण सरकार स्थापनेवेळी जेव्हा उद्धव ठाकरे पहिल्यांदा शरद पवारांकडे रात्री भेटायला गेले त्यावेळी मुख्यमंत्रीपदाचं नाव जाहीर होणार होतं. तेव्हा उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे दोघेचं होते. त्यामुळे तुमची कुंडली माझ्याकडे आहे. वेळ आल्यावर ती बाहेर काढली जाईल”

देवेंद्र फडणवीसांवरही आरोप केलेत तर ते सिद्ध करुन दाखवा. तुमच्या मुख्यमंत्र्यांवरील बंद करण्यात आलेल्या केसबद्दल देखील तुमच्यापेक्षा मला जास्त माहिती आहे. पण मी अजून या प्रकरणावर तोंड उघडलेलं नाही, अद्याप गप्प आहे मी. आदित्य ठाकरेंसह सर्व व्यवहार मला माहिती आहेत पण आम्ही गप्प बसलोय. ईडीच्या अधिकाऱ्यांनी ३०० कोटी रुपये घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. यावर ईडीनं गप्प बसू नये त्यांना घेऊन जावं,  असा हल्लाबोलही राणेंनी राऊतांवर केला.

RELATED ARTICLES

Most Popular