25.1 C
Ratnagiri
Thursday, November 21, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeKhedखेर्डीतील राष्ट्रीय महामार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात

खेर्डीतील राष्ट्रीय महामार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात

काहींनी रस्त्याकडेला पानटपऱ्या टाकून बस्तान बसवले.

खेर्डी येथील एका अभियंत्याचा एसटीच्या धडकेत मृत्यू झाल्यानंतर खेर्डीतील राष्ट्रीय महामार्गावर झालेली अतिक्रमणे पुन्हा रडारवर आली आहे. खेडींत रस्ता रूंदीकरण झाल्यानंतर अनेकांनी रस्त्यावर आणि रस्त्याच्या शेजारी विविध प्रकारची दुकाने थाटली. त्याचबरोबर रस्त्यावरच मोठी वाहने नियमितपणे पार्किंग केली जात आहेत. या साऱ्यांचा परिपाक म्हणून सातत्याने येथे अपघाताची मालिका सुरू आहे. अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेला महामार्गाची सुटका करण्यासाठी पोलिस प्रशासनासह राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून देखील कारवाईचे पाऊल उचलले जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

खेर्डीतील श्री दत्तमंदिरासमोरील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या एका भाजीपाला व्यावसायिकाकडे भाजीपाला, फळे घेण्यासाठी गेलेल्या खेडींतील अनिकेत दाभोळकर याला एसटीने धडक दिली. या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेवरून सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. बहादूरशेखनाका ते सतीदरम्यान साधारण १६-१७ वर्षांपूर्वी रूंदीकरण झाले होते. परिणामी, रस्ता मोठा झाल्यानंतर वाहनांचा वेग वाढला. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी याच रस्त्याचे काँक्रिटीकरण झाल्यानंतर वाहनांच्या वेगास पुन्हा गती मिळाली. तालुक्यात दसपटी विभागातून येणारा हा प्रमुख मार्ग त्याचबरोबर कऱ्हाडकडे जाणारा प्रमुख राष्ट्रीय महामार्ग असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते.

त्यातच रस्त्याच्या कडेला अनेकांनी वाहनांचा पार्किंगचा अड्डाच बनवला आहे. काहींनी रस्त्याकडेला पानटपऱ्या टाकून बस्तान बसवले. त्याचबरोबर परजिल्ह्यातून येणारे फळविक्रेते रस्त्यावरच गाड्या लावून विक्री करतात. काहींनी रस्त्यावर गॅरेजचा व्यवसाय सुरू ठेवला आहे. अनेक भाजी व्यापारी रस्त्याच्या कडेला ठाण मांडून बसले आहे. या सर्व व्यावसायिकांकडे येणाऱ्या ग्राहकांच्या दुचाकी रस्त्यावरच पार्किंग केल्या जातात. यातून सातत्याने अपघात घडत आहेत.

यावरून मध्यंतरी माजी सरपंच दशरथ दाभोळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी आवाज उठवल्यानंतर वाहनांची गती रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाकडून रॅम्बलर बसवण्यात आले; मात्र ते दोन-तीन महिन्यात उखडले. त्यानंतर तीन दिवसांपूर्वी पुन्हा नव्याने लहान गतिरोधक बसवण्यात आले होते. तरीही सुसाट वाहने धावत आहेत. त्यामुळे अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेला हा महामार्ग सुरळीत करण्यासाठी नागरिकांनी प्रांताधिकाऱ्यांची भेट घेत कारवाईची मागणी केली आहे. त्यानुसार प्रांताधिकाऱ्यांनी पोलिस प्रशासन तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागालाही सूचना दिल्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular