26.8 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeKokanनेत्रावती तसेच गरीबरथ एक्स्प्रेस दोन्ही गाड्या विजेवर चालणार

नेत्रावती तसेच गरीबरथ एक्स्प्रेस दोन्ही गाड्या विजेवर चालणार

कोचुवली ते मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणार्‍या गरीब रथ एक्स्प्रेसला २२ सप्टेंबरपासून विद्युत इंजिन जोडले जाणार आहे.

सहा महिन्यांपूर्वीच कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झालेले असून, आता रेल्वे प्रशासन टप्प्या टप्प्याने कोकण मार्गे धावणार्‍या रेल्वे गाड्या डिझेल ऐवजी विद्युत इंजिनिअर चालविल्या जाणार आहे. गेल्या वर्षापासूनच विद्युतीकरण पूर्ण झाल्यानंतर कोकण रेल्वे मार्गे धावणार्‍या मालगाड्या विद्युत इंजिनवर चालवणे सुरु केले आहे. आणि आता प्रवासी रेल्वे गाड्याही टप्प्याटप्प्याने विद्युत इंजिनवर चालवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार २० सप्टेंबरपासून तिरुअनंतपुरम ते एलटीटी दरम्यान धावणारी नेत्रावती एक्स्प्रेस विद्युत इंजिनसह चालवली जाणार आहे. तर सोबतच कोकण रेल्वे मार्ग धावणारी गरीबरथ एक्स्प्रेस या दोन गाड्या विद्युत इंजिनसह चालविल्या जाणार आहेत. गरीबरथ एक्स्प्रेस विजेवर चालवली जाणार असल्याच्या माहितीवर कोकण रेल्वे प्रशासनाने दुजोरा दिला आहे.

अधिक माहितीमध्ये, लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम या मार्गावर धावताना २० सप्टेंबरपासून नेत्रावती एक्स्प्रेसला डिझेलऐवजी विद्युत इंजिनवर चालवले जाईल. याच बरोबर कोचुवली ते मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणार्‍या गरीब रथ एक्स्प्रेसला २२ सप्टेंबरपासून विद्युत इंजिन जोडले जाणार आहे. परतीचा प्रवास २३ सप्टेंबरपासून सुरू होईल. गरीब रथ एक्स्प्रेस डिझेल इंजिन ऐवजी विद्युत इंजिनवर धावणार आहे.

केंद्र शासनाने कोकण रेल्वे मार्गावरील रोहा ते बेंगलोर या टप्प्याच्या विद्युतीकरणासाठी ११०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यानुसार या विद्युतीकरणाच्या कामाचा वेर्णा येथून प्रत्यक्ष कामाला आरंभ करण्यात आला. त्यानंतर रत्नागिरी ते रोहा २०४ किलोमीटरच्या विद्युतीकरणाला डिसेंबर २०१८ मध्ये सुरुवात करण्यात आली. फेब्रुवारी २०२१ ला पहिली चाचणी पार पडली होती.

RELATED ARTICLES

Most Popular