24 C
Ratnagiri
Wednesday, March 26, 2025

निधी मिळूनही रखडला काजिर्डा घाट…

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह घाटमाथ्यावरील कोल्हापूर जिल्हा...

‘ते’ कंत्राटी शिक्षक मानधनाच्या प्रतीक्षेत – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील ४५४ कंत्राटी शिक्षकांना...

मंजूर एमआरआय मशीन अडकले कुठे ? सिव्हिल-वैद्यकीय महाविद्यालयात समन्वयाचा अभाव

जिल्हा शासकीय रुग्णालयाला कोट्यवधीचे अत्याधुनिक एमआरआय मशीन...
HomeRatnagiriसात औद्योगिक संस्थांना नवी ओळख…

सात औद्योगिक संस्थांना नवी ओळख…

रत्नागिरी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे नाव देण्यात आले आहे.

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे महाराष्ट्रातील १४३ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्यात आले आहे. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील ७ शासकीय औद्योगिक संस्थांचा समावेश असून, त्यांना आदर्श व्यक्तीमत्वांची नावे आली आहेत देण्यात काही दिवसांपूर्वीच १४ नामकरण शासकीय औद्योगिक करण्याचा
संस्थांचे निर्णय मंत्रिमंडळाद्वारे घेण्यात आला होता. कौशल्य विकास विभागाद्वारे महाराष्ट्रातील शासकीय औद्योगिक संस्थांसाठी नागरिकांकडून नावाबाबत सूचना मागवण्यात आल्या होत्या. महाराष्ट्रातील फक्त २ औद्योगिक संस्था सोडल्या तर इतर औद्योगिक संस्थांना या आधी कोणत्याही प्रकारची नावे नव्हती.

याबाबत मंत्री लोढा म्हणाले की, औद्योगिक संस्थांचे नामकरण हा केवळ एक निर्णय नसून, महाराष्ट्रातील तरुणांना प्रेरणा देण्यासाठीचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या संस्थांना आदर्श व्यक्तीमत्वांच्या नावाने ओळख मिळाल्याने या विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची शिकवण व प्रेरणा मिळेल. युवकांचा कौशल्य विकास हे राज्याच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे आणि या नावांमुळे प्रत्येक प्रशिक्षणार्थीला आपल्या कार्यात सामाजिक जबाबदारीची जाणीव होईल. हा उपक्रम नव्या पिढीला त्यांच्या भविष्याच्या वाटचालीसाठी प्रेरणा देईल आणि त्यांच्या मेहनतीला एक दिशा देईल.

नामकरण केलेल्या प्रशिक्षण संस्था – रत्नागिरी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे नाव देण्यात आले आहे. महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला राणी लक्ष्मीबाई, खेड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला क्रांतिकारी अनंत कान्हेरे यांचे, दापोली औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला धोंडो केशव कर्वे यांचे, मंडणगड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला नाना फडणवीस यांचे, चिपळूण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भगवान परशुराम यांचे तर संगमेश्वर प्रशिक्षण संस्थेला माधवराव मुळे यांचे नाव देण्यात आले आहे..

RELATED ARTICLES

Most Popular