27 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeInternationalइंग्लंड शासनाची नागरिकांसाठी नवीन योजना

इंग्लंड शासनाची नागरिकांसाठी नवीन योजना

देशातील प्रत्येक नागरिकाला सूचना देण्यात आली आहे की, प्रत्येकाने आठवड्यातून दोन वेळा कोरोना चाचणी करने अनिवार्य आहे.

इंग्लंडमध्ये झालेला कोरोनाचा उद्रेक पाहता, इंग्लंडने कोरोनाचा सामना करण्यासाठी जलद लसीकरणानंतर आणखी एक मोठी योजना आता सुरू करण्याचा विचार केला आहे. पंतप्रधान जॉन्सन यांनी अर्थव्यवस्था लॉकडाऊननंतर पुन्हा सुरू करण्यांतर्गत या योजनेची घोषणा केली आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला सूचना देण्यात आली आहे की, प्रत्येकाने आठवड्यातून दोन वेळा कोरोना चाचणी करने अनिवार्य आहे. आरोग्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे की, ९ एप्रिलपासून प्रत्येकाला आठवड्यात दोनदा मोफत रॅपिड कोरोना चाचणी करता येणार आहे. जवळचे औषधांचे दुकान, होम डिलिव्हरी आणि कम्युनिटी सेंटर मध्ये मोफत चाचणी किट उपलब्ध केले गेले आहे. जॉन्सन ‘कोविड स्टेटस सर्टिफिकेशन’ योजना जाहीर करणार आहेत.

६.८ कोटी लोकसंख्य असलेल्या इंग्लंडमध्ये कोरोनापासून बचावासाठी अजूनपर्यंत ३.७ कोटी डोस देण्यात आले आहेत. ४७% लोकसंख्येला कमीत कमी एक डोस दिला आहे. ५० लाख लोकांना दुसरा डोसही देण्यात आला आहे. पूर्ण लोकांची वेगाने चाचणी करून आणि कोविड स्टेटस सर्टिफिकेशन सिस्टिमद्वारे महामारीला नियंत्रित केले जाऊ शकते, असे सरकारला वाटते आहे. युरोपात सर्वाधिक मृत्यूची संख्या इंग्लंडमध्येच जास्त आहे.

covid vaccine in UK

जगामध्ये २४ तासांमध्ये ५.२६ लाख नवे रुग्ण आढळले असुनासून, यामुळे आकडा १३.२ कोटी झाला आहे. २४ तासांत भारतात विक्रमी १.०३ लाख रुग्ण आढळले. सर्वात बाधित अमेरिकेसाठी नक्कीच हे एक दिलासादायक वृत्त आहे. तेथे २४ तासांमध्ये ३६९८३ नवे रुग्ण आढळले आहेत. २७ सप्टेंबरनंतर पहिल्यांदाच तेथे आकडा ४० हजारांपेक्षा कमी रुग्णसंख्येचा आढळला आहे. तसेच दुसरा सर्वाधिक बाधित ब्राझीलमध्ये ३१३५९ बाधित सापडले आहेत. इंग्लंडमध्ये १७ मेपासून पुन्हा आंतरराष्ट्रीय उड्डाणाना सुरूवात करण्याची तयारी दर्शविली आहे. यासाठी एक ट्रॅफिक लाइट यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, यामध्ये जगातील इतर देशांना कोरोनाच्या दृष्टीने रेड, यलो आणि ग्रीन भागांमध्ये विभागले गेले आहे.

क्वॉरंटाइन व आयसोलेशनचे कडक नियम रेड व यलो कलर देशांमधून येणाऱ्यांसाठी लागू असतील. ग्रीन कलर देशांमधून येणाऱ्यांना विलगीकरणात राहावे लागणार नसले तरी इंग्लंडला आल्यावर प्रथम चाचणी करून घ्यावी लागणार आहे. कोविड स्टेटस सर्टिफिकेशन सिस्टिम म्हणजेच कोरोना पासपोर्ट तयार केला जाईल. ज्यांच्याकडे तो असेल त्यांना नाइट क्लब, थिएटरमध्ये, क्रीडा मैदान इ. ठिकाणी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले, अद्यापपर्यंत ब्रिटिश जनतेने कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी खूपचं प्रयत्नशील राहिले आहेत. लसीकरण मोहिमेमध्ये आम्हाला यश मिळत असून, कडक निर्बंधांमध्येही काही प्रमाणात हळूहळू शिथिलता आणण्यात येत आहे. त्याच सोबतीने अधिकाधिक कोरोना चाचण्या होणे देखील तितकेच महत्त्वाचे असून, महामारी विरोधातील लढा त्यामुळे अधिक तीव्र होईल. त्यामुळे ब्रिटनमध्ये सर्वांना जलद कोरोना निर्बंधक चाचणी करण्याची मोफत सुविधा आम्ही उपलब्ध करून देत आहोत. जेणेंकरून साथ आटोक्यात येण्यास नक्कीच मदत होउन आमचे ध्येय साध्य होईल, असेही त्यांनी म्हटले.

RELATED ARTICLES

Most Popular