26.2 C
Ratnagiri
Thursday, October 24, 2024

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई- गोवा बनावटीच्या मद्यासह कोटीचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरी, दि. २३ (जिमाका)- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर...

या खेळाडूच्या टीम इंडियात पुनरागमनाचे भवितव्य काय…

भारत विरुद्ध न्यूझीलंड पुणे कसोटी आता जवळ...
HomeChiplunचिपळुणात ठाकरेंच्या पाठीशी नवी ताकद

चिपळुणात ठाकरेंच्या पाठीशी नवी ताकद

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुस्लिम समाजाच्या रूपाने नवा मतदार मिळाला आहे. 

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचा पराभव झाला तरीही चिपळूण विधानसभा मतदारसंघातून राऊत यांना सुमारे १९ हजार मतांचे मताधिक्य मिळाले. या मतदारसंघांत मुस्लिम समाजाचे प्राबल्य आहे. भाजपवर नाराज असलेला हा समाज उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे वळला आहे. मुस्लिम मोहल्ल्यातून ठाकरे गटाचे राऊत यांना सर्वाधिक मतदान झाल्याचे निवडणूक निकालानंतर आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. शिवसेनेचा पारंपरिक नसलेला नवा मतदार ठाकरे गटाला मिळाल्याने उत्साहाचे वातावरण आहे. दुसरीकडे कप्रिससह दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी हो धोक्याची घंटा ठरू शकते.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निकालाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. चिपळुणात महाविकास आघाडीचाच दणका पाहायला मिळाला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून भाजपचे नारायण राणे निवडून आले तरीही चिपळूण विधानसभा मतदारसंघात ठाकरेंसाठी मुस्लिम समाजाचे मतदार कैवारी ठरले आहेत. कारण, या वेळची लोकसभा निवडणूक ठाकरे शिवसेनेसाठी महत्त्वाची होती. पक्षफुटीनंतरची ही पहिलो निवडणूक असल्यामुळे ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यातच यंदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुस्लिम समाजाच्या रूपाने नवा मतदार मिळाला आहे.

त्यामुळे चिपळूण विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे राऊत यांना मताधिक्य मिळाल्याची चर्चा सुरू आहे. निवडणूक निकाला नंतर मुस्लिम मतदार ठाकरेंच्या बाजूने ठामपणे उभे राहिल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. शिवसेना एकेकाळी कट्टर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळखला जायचा आणि त्यामुळे मुस्लिम समाज शिवसेनेपासून दोन हात लांबच पाहायला मिळायचा. आता शिवसेना दोन गटांत विभागली असून, ठाकरेंच्या शिवसेनेत हे समीकरण काहीसे बदलल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेला चिपळूण शहर आणि ग्रामीण भागातील मुस्लिम मतदारांनी भरभरून पाठिंबा दिल्याचे यंदाच्या निवडणुकीत पाहायला मिळाले.

RELATED ARTICLES

Most Popular