27.1 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeRatnagiriगरजूंच्या मदतीसाठी पाटीदार युवा मंडळ आणि रिलायंस फाउंडेशन धावली

गरजूंच्या मदतीसाठी पाटीदार युवा मंडळ आणि रिलायंस फाउंडेशन धावली

रत्नागिरी जिल्ह्यातील संकटकाळामध्ये मदतीसाठी कायम अग्रेसर असणारी संस्था पाटीदार युवा मंडळ आणि रिलायंस फाउंडेशन च्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीमधील बेरोजगार, गरीब, निराधार वृद्ध, हातावर पोट अवलंबून असणारे मोलमजुरी करणारे कामगार अशा सर्वाच्या मदतीसाठी धावून गेली आहेत. पाटीदार युवा मंडळ आणि रिलायंस फाउंडेशनच्या कर्मचार्यांनी १५० गरजू कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तू रेशन कीट आणि कोरोना काळातील संरक्षक कवच समजले जाणारे मास्क यांचे वाटप केले आहे.

पाटीदार युवा मंडळ आणि रिलायंस फाउंडेशनने गरजू व्यक्तींची गरज ओळखून संपूर्ण देशभरामध्ये मिशन अन्नसेवा राबवण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यामुळे पाटीदार युवा मंडळ मदत करत असून, ही संस्था विविध सामाजिक कार्यक्रमात रत्नागिरी अग्रेसर असतेच. ग्रामीण आणि शहरी भागातील गरजू मिळून एकूण १५० कुटुंबापर्यंत मदत पोहोचवली आहे. तसेच फळ भाजी विक्रेते यांना कोरोना सुरक्षिततेसाठी १ हजार मास्कचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमामध्ये रिलायंस फाउंडेशन महाराष्ट्रचे समन्वयक दीपक केका, जिल्हा व्यवस्थापक कांबळे, पाटीदार युवा ग्रुपचे हितेंद्र पटेल, विजय पटेल, भावेश पटेल यांसह पाटीदार ग्रुपचे सदस्य आणि ग्रामस्थ यांची उपस्थिती लाभली. तसेच अनेक मदतीचे हात सुद्धा सक्रीय होते, त्यामध्ये निलेश विलणकर, सचिन सावंत, जितु पटेल, संतोष सावंत यांचे सहकार्य लाभले.

कोरोना काळामध्ये अशा प्रकारच्या केलेल्या समाज कार्याला सर्व स्तरातून मदतीचे हात पुढे सरसावत असतात. आणि गरजू लोकांना वेळेला उपयोगी पडल्याचे एक समाधान मिळते. त्यामुळे जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचवण्याचे कार्य आमच्या दोन्ही संस्थेमार्फत सुरु आहे.

 

पूर्वीचा लेख
पुढील लेख
RELATED ARTICLES

Most Popular