आत्महत्या कशी करायची, आत्महत्या केल्यावर तात्काळ जीवन कसे संपेल यासह बँकेतील कामात यशस्वी व्हायचे असेल तर कशा पध्दतीने काम करायला पाहिजे यासारखे व्हिडीओतून युट्यूबवरुन निलिमा चव्हाण हिने माहिती घेतली असल्याचे तिच्या नंबरवरुन दिसून आले असल्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले. चिपळूण ओमळी येथील निलिमा चव्हाण हिचा मृतदेह दाभोळ खाडीत सापडला होता. याप्रकरणात आत्महत्या करण्यास भाग पाडले म्हणून बँकेच्या प्रोजेक्ट मॅनेजरला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान याप्रकरणात विविध ‘अॅगल’ने तपास करण्यात येत आहे.
निलिमा अत्यंत हुशार व मितभाषी असल्याचे चौकशी पुढे आले आहे. या मितभाषीपणामुळे टार्गेट पूर्ण करताना अनेक वेळा परिणाम होत होता. त्यामुळे वरिष्ठांच्या दबावाला ती कंटाळली होती. याबाबत तिने आपले वडील व भाऊ यांच्या कानावरही खाती उघडण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचे सांगितले होते. तिच्या मोबाईल नंबरवरुन फेसबुक, युट्यूब, इन्स्टा याचा वापर झाला का याचीही चौकशी पोलिसांकडून सुरु होती. यात युट्यूब व अन्य माध्यमातून तिने आत्महत्या कशी करावी.
कशा पध्दतीने आत्महत्या केल्यावर तात्काळ जीवन संपेल, त्याचप्रमाणे आपल्या कामात परफेक्ट होण्यासाठी काय करावे, संवाद कौशल्य वाढवण्यासाठीही युट्यूबवरील माहिती घेत असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे त्यादृष्टीनेही पोलीस यंत्रणा तपास करीत असल्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले. शहरात मागील काही दिवसात अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या सर्वांनाच तडीपार करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.