25.8 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiriशुल्लक कारणावरून खाजगी रुग्णालयात वृद्धाला मारहाण

शुल्लक कारणावरून खाजगी रुग्णालयात वृद्धाला मारहाण

पटेल यांच्या अन्य नातेवाईकांनी गर्दी केल्याचे पाहून इम्तियाज पटेल यांनी गर्दी कमी करा असे त्यांना सांगितले.

रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एक रुग्णाच्या वृद्ध नातेवाईकाला किरकोळ कारणावरून जबरदस्त मारहाण करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. हा प्रकार रत्नागिरीतील चिरायू या खासगी हॉस्पिटल परिसरात घडला अशी नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. किरकोळ कारणातून वृद्धाला गाडीची चावी असलेल्या फाईटने आणि लाथानी मारहाण केली, अशी माहिती बुधवारी पोलिसांकडून देण्यात आली. याप्रकरणी आरोपी महिताप अब्दुल हमीद साखरकर याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अब्दुल हमीद साखरकर याच्या विरोधात पीडित इम्तियाज अब्दुल सत्तार पटेल (६२) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, सोमवारी इम्तियाज पटेल यांचे नातेवाईक अन्वर पटेल यांच्या मुलाचा अपघात झाला होता. त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेऊन सिटीस्कॅन करण्यासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी पटेल यांच्या अन्य नातेवाईकांनी गर्दी केल्याचे पाहून इम्तियाज पटेल यांनी गर्दी कमी करा असे त्यांना सांगितले.

याचा राग आल्याने महिताप साखरकरने इम्तियाज पटेल यांच्या शर्टची कॉलर पकडून गाडीची चावी असलेल्या फाईटने आणि लाथानी मारहाण केली. मारहाणीची ही घटना सोमवारी, २६ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास खासगी हॉस्पिटलमध्ये घडली आहे. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.

या सगळ्या प्रकरणी भा.द.वि.का.क. ३२४,३२३, ५०४ प्रमाणे संशयित रुग्णावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आजारी वृद्धाला मारहाण झाल्याने काही काळ घबराट उडाली होती. गर्दी करू नका असे सांगितले म्हणून अशा क्षुल्लक गोष्टीवरून हा सगळा प्रकार घडला आहे. पण भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून नियमावलीचे पालन करणे हे सगळ्यानीच गरजेचे आहे. दवाखाने, मोठी हॉस्पिटल्स अशा ठिकाणी या घटना घडण्यावर निर्बंध घालण्यात यावेत अशी मागणी जनतेमधून होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular