28.1 C
Ratnagiri
Thursday, June 1, 2023

बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न, दोघांना अटक

शहराजवळील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कुवारबाव एटीएम...

वाघळी पकडणारा सातारचा संतोष यादव सर्फ फिशिंग स्पर्धेमध्ये प्रथम

रत्नागिरी फिशर्स क्लब आयोजित ओपन सर्फ फिशिंग...

आजपासून मासेमारी बंदी कालावधी सुरू , नियम मोडणाऱ्यांवर करडी नजर

शासनाच्या निर्देशानुसार १ जूनपासून मासेमारी बंदी सुरू...
HomeMaharashtraआमची मान झुकवण्याची ताकद कोणाच्याही बापामध्ये नाही, फडणविसांचे प्रत्युत्तर

आमची मान झुकवण्याची ताकद कोणाच्याही बापामध्ये नाही, फडणविसांचे प्रत्युत्तर

कर्नाटकचे मुख्यमंत्री वाटेल ते बोलतात आणि हे आपण केवळ उघङया डोळ्याने पाहायचं का?, अशी विचारणा भास्कर जाधव यांनी केली

शिवसेना आणि भाजप यांचा वादाची ठिणगी अधिवेशनामध्ये देखील पडल्याचे समोर आले आहे. कर्नाटक सरकारविरोधात घाईघाईने कोणताही निर्णय न घेता, राज्य सरकार धीम्या गतीने पुढे सरकत असल्याची टीका विरोधकांनी केली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सर्वात प्रथम भाष्य करत ठराव मांडायला हवा होता असं सांगितलं. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज किंवा उद्या ठराव मांडला जाईल अशी माहिती दिली.

अमित शाह यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना दिल्लीला बोलावून घेतलं आणि संयम पाळण्यास सांगितलं होतं. पण आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मान खाली घालून गप्प आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री वाटेल ते बोलतात आणि हे आपण केवळ उघङया डोळ्याने पाहायचं का?, अशी विचारणा भास्कर जाधव यांनी केली त्यांनी भास्कर जाधवांच्या टीकेला उत्तर देताना आमची मान झुकवण्याची ताकद कोणाच्याही बापामध्ये नाही असं म्हटलं आहे.

“सीमाभागात मराठी बांधवांवर अत्याचार होत असून, अजून त्यांना दडपशाहीने वागवंल जात आहे. यापेक्षा महत्त्वाचं काम काय असणार. सरकारने बाकीचं कामकाज बाजूला सारुन मराठी बांधवांवरील अन्यायाला वाचा फोडावी आणि संपूर्ण महाराष्ट्र मराठी बांधवांच्या पाठीशी आहे हे कर्नाटकला दाखवलं पाहिजे. यानंतर देवेंद्र फडणवीस उत्तर देण्यासाठी उभे राहिले. “या मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला मान खाली घालावी लावेल अशी कोणाच्या बापाची हिंमत नाही. जसं ते म्हणतात तसं आपणही इंच इंच लढू. केंद्रात, सर्वोच्च न्यायालयात आपण मराठी बांधवांवरील अन्याय दूर करण्यासाठी हवं ते करु,” असं फडणवीस यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular