25.2 C
Ratnagiri
Sunday, December 3, 2023

कोकणात पंधरा टक्के हापूस कलमांना मोहोर

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ८५ टक्के झाडांना...

…त्या अधिकारी, सुरक्षा रक्षकांना निलंबित करा, शाश्वत मच्छीमार हक्क संघाची मागणी

दापोली तालुक्यात दाभोळच्या सक्षम् परवाना अधिकारी दीप्ती...

चिपळुणातील कोसळलेले गर्डर हटवण्याच्या हालचाली सुरू

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथील कोसळलेल्या उड्डाणपुल...
HomeMaharashtra"अन्यथा परिणाम भोगायला तयार राहा", नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा!

“अन्यथा परिणाम भोगायला तयार राहा”, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा!

मुख्यमंत्रिपदावर राहिलेल्या व्यक्तीकडून अशी भाषा शोभत नाही. तूम्ही ईडी, बिडी वैगरे बोलू नका नाहीतर योग्य जागी पाठवलं जाईल. भाजपच्या नेत्याला अशी भाषा बोलला तर परिणाम वाईट होईल, अशा शब्दात भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना इशारा दिला,ठाण्यात रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली होती. त्यांच्या या टीकेनंतर राणेंनी पत्रकार परिषद घेऊन जशास तसे उत्तर दिले.
राज्याचे निष्क्रिय माजी मुख्यमंत्री ठाण्याला गेले. काल ते डिलिव्हरी करण्यासाठी ठाण्यात गेले होते का? खरंच त्या महिलेला मार लागला होता का? खरंच ती महिला गरोदर होती का? रिपोर्ट नाही. मात्र असं असताना उद्धव ठाकरेंनी चुकीचं भाषण केलं आहे, असंही राणे म्हणाले.

‘मुख्यमंत्रिपदावर राहिलेल्या व्यक्तीकडून अशी भाषा शोभत नाही. अभिनेता सुशांत सिंग राजपूतला का मारले गेले? दिशा सालियन का मारले गेले? वाझे तुमचे जावई आहेत का? गुन्हेगारी करणारा व्यक्ती मंत्री कसा काय होऊ शकतो. नवाब मलिकांवर गुन्हा दाखल होतो, जेल मध्ये जातात तरीही कारवाई करत नाही, अशी टीकाही राणेंनी केली.बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र सोडले तर तुमचे काय योगदान आहे? बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आणि शरद पवार यांची मेहरबानी म्हणून मुख्यमंत्री झाले. बाळासाहेब आयुष्य भर कोणत्याही पदावर बसले नाही उद्धव ठाकरे यांच्याकडून घणाघात होऊ शकतो का? अशी टीकाही राणेंनी केली.मी सामनाला वृत्तपत्र म्हणणार नाही. मी कधी सामना वाचत नाही मात्र आज मागवून घेतले. असं वृत्तपत्र राज्यात चालू ठेवावं का? असं वृत्तपत्र चालू चालेल का, काय भाषा यामध्ये आहे, याबद्दल मी कोर्टात जाणार आहे, असंही राणे म्हणाले.

मातोश्री नावाचे दोन्ही बंगले अधिकृत आहेत का, वाझे उद्धव ठाकरेंचे जावई आहेत का? असा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांनी केला आहे. राणे म्हणाले की, राज्याचे माजी निष्क्रिय मुख्यमंत्री हे काल ठाण्यात कुणाची तरी डिलिव्हरी करायला गेले होते. माझ्याकडे डॉक्टरचे सर्व कागदपत्रे असून डॉक्टरांनी त्यांना काही झाले नसल्याचे सांगितले. उद्धव ठाकरेंना चांगले बोलता येते का, असा सवालही नारायण राणेंनी उपस्थित केला आहे. त्यांनी राज्याच्या संस्कृतीला न शोभणारी भाषा त्यांनी काल केली. तर मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात सुशांत, दीक्षा सालियान, यांना प्रकरणाचे काय झाले? असा सवाल ही नारायण राणे यांनी उपस्थित केला.नारायण राणे म्हणाले की, देशाबाहेरील शक्तीसोबत संबंध असलेल्या लोकांना मंत्री केले, त्यांचे मंत्री जेलमध्ये गेले तेव्हा काही केले नाही. पंतप्रधान, , केंद्रीय मंत्री आणि राज्याचे गृहमंत्री यांच्यावर बोलण्यांची त्यांची पात्रता नाही. बाळासाहेब असते तर हे कधीच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते. हिंदुत्वाचा त्याग करुन पद मिळवले. उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांच्या नावाशिवाय कुणी विचारत नाही.

RELATED ARTICLES

Most Popular