24.8 C
Ratnagiri
Monday, November 24, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriरखांगी ब्रदर्सचे सामाजिक कार्य

रखांगी ब्रदर्सचे सामाजिक कार्य

राजापूर स्थित रखांगी ब्रदर्स यांनी मिळून कोरोना महामारीच्या काळामध्ये हॉस्पिटलमध्ये लागणाऱ्या ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा वाजवी दरामध्ये उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांचा पंचक्रोशी ग्रामविकास समिती मुंबईतर्फे कृतज्ञतापत्र देऊन आभार मानण्यात आले आहेत. रखांगी हे तीन भाऊ असून त्यांची ऑक्सिजन सिलेंडर ची कंपनी असून, पंचक्रोशीमध्ये जाणवणाऱ्या ऑक्सिजानवरील कमतरतेवर उपाय शोधून या तिन्ही भावांनी मिळून, पंचक्रोशीच्या प्राणवायू उपक्रमामध्ये लाखमोलाची मदत केली आहे.

रखांगी ब्रदर्स हे मुळचे राजापूर तालुक्यातील दसुरे गावातील रहिवासी असून त्यांच्यातील एक भाऊ लांज्यामध्ये वास्तव्याला आहे. पंचक्रोशी ग्रामविकास समितीमार्फत ग्रामीण रुग्णालयासह, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अत्यावश्यक असणाऱ्या वैद्यकीय साहित्य, तसेच ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा करण्यात आला आहे.

रखांगी ब्रदर्सची स्वतःची ऑक्सिजन सिलेंडरची कंपनी असल्याने मुंबई पासून अगदी गावापर्यंत ते सिलेंडरचा पुरवठा करतात. कोविड काळामध्ये रुग्णांना सतत ऑक्सिजनची गरज भासत आहे. त्यामुळे मुंबईमधील पाचशे हून अधिक रुग्णालयांमध्ये त्यांच्या कंपनीमधूनच पुरवठा केला जात आहे.

तसेच त्यांनी या कार्यक्रमाच्या वेळी अजून एक महत्वाची इच्छा बोलून दाखवली कि, जर राजापूर मध्ये ऑक्सिजन प्लांट तयार करण्यासाठी जागा उपलब्ध झाली तर भविष्यात एखादा ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा त्यांचा संकल्प आहे. पंचक्रोशी ग्रामविकास समितीला अगदी माफक दरामध्ये ऑक्सिजन उपलब्ध करून दिल्याने त्यांच्या या संकटकाळी केलेल्या मदतीची जाणीव ठेवून फुल ना फुलाची पाकळी म्हणून त्यांचे कृतज्ञता पत्र देऊन आभार मानण्यात आले. या प्रसंगी या ऑक्सिजन मिळविण्याच्या मदतीच्या काळी रविकांत माळी आणि कुडकर यांचे सुद्धा सहकार्य लाभले त्यांचेही आभार मानण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular