25.1 C
Ratnagiri
Thursday, November 21, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeInternationalपाकिस्तानात भल्या पहाटे घडली मोठी रेल्वे दुर्घटना

पाकिस्तानात भल्या पहाटे घडली मोठी रेल्वे दुर्घटना

आपल्या भारताच्या शेजारी अर्थात पाकिस्तानमध्ये आज सकाळी एक मोठी रेल्वे दुर्घटना घडलेली आहे. सिंध परिसरातील  गावांमध्ये दोन ट्रेन एकमेकांबरोबर आदळल्या या घटनेमध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचे प्रथम दर्शनी लक्षात येत आहे.  आताच्या माहितीनुसार जवळपास ३० लोक या घटनेमध्ये मृत्युमुखी पडल्याचे सूत्रांकडून समजले आहे. मिल्लत एक्सप्रेस आणि सर सय्यद एक्सप्रेस या दोन ट्रेनच्या दुर्घटनेमुळे मृतांची संख्या आणखीन वाढल्याची शक्यता आहे.

जिओ टिव्ही नुसार मिल्लत एक्सप्रेसचे डबे अनियंत्रित होऊन दुसऱ्या पटरीवर गेले आणि त्याच वेळेला समोरून येणाऱ्या सय्यद एक्सप्रेस लाही त्या डब्यांना टक्कर दिली. याच अपघातामुळे मिल्लत एक्स्प्रेसचे आठ आणि सय्यद एक्सप्रेस च्या इंजिन समवेत चार डबे हे रेल्वेचा पटरी वरून उतरले गेले आणि पलटी झाले. या दुर्घटनेमध्ये ३० लोक मृत्युमुखी झाल्याचे आतापर्यंत समजून येत आहे आणि जवळपास ७० ते ८० लोक जखमी झाल्याचे समजलेले आहे

pakistan train accident

माहितीनुसार, मिल्लत एक्सप्रेस कराची वरून सरगोधा आणि सर सय्यद एक्सप्रेस रावळपिंडी वरून कराची येथे जात होत्या ही घटना सकाळी ०३ वाजून ४५ मिनिटांनी घडली. ही दुर्घटना घडल्यानंतर देखील जवळपास चार तास या ठिकाणी कोणतेही अधिकारी पोहोचले नव्हते. आतासुद्धा अनेक प्रवासी ट्रेनमध्ये अडकल्याचे समजून येत आहे त्या सर्वांना वाचवण्यासाठी ट्रेनचे पत्रे कापून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न चालू आहे. सकाळी नऊ वाजता मेडिकल टीम घटनास्थळी पोहोचली आहे. रेस्क्यू टीम आधीपासूनच मदत कार्य करत आहे, यावर्षीची पाकिस्तान मध्ये घडलेली ही सगळ्यात मोठी रेल्वे दुर्घटना आहे.

RELATED ARTICLES

Most Popular