28.9 C
Ratnagiri
Tuesday, June 17, 2025

जिल्ह्यात पाच महिन्यांत १२ बेवारस मृतदेह

नदी, समुद्रकिनारी, खाजणात, जंगलात किवा अगदी निर्जनस्थळी...

अंतिम प्रभाग रचना एक सप्टेंबरला होणार जाहीर

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत....

खेडच्या नाट्यगृहाचा पडदा दोन दशकांनी उघडणार

शहरातील स्व. मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र तब्बल...
HomeEntertainmentओह माय गॉडचा दूसरा भाग येणार !

ओह माय गॉडचा दूसरा भाग येणार !

बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमारच्या सर्व हिंदी चित्रपटांच्या सिक्वलला घेऊन सध्या खूप चर्चा चालू आहेत. भूल भुलैया, हेराफेरी याच्या व्यतिरिक्त ओ माय गॉड या चित्रपटाच्या सिक्वल बाबत देखील खूप सार्‍या गोष्टी पुढे यायला लागल्या आहेत. सूत्रानुसार चित्रपटामध्ये अक्षय कुमारच्या सोबत दुसर्‍या भागामध्ये पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यावेळेला पंकज त्रिपाठी परेश रावल यांच्या जागी भूमिका करत आहेत.

PANKAJ TRIPATHI IN OMG2

ओ माय गॉड या चित्रपटाची स्क्रिप्ट आणि प्लॉटवर बरेच महिने काम चालू होते. याच्या दुसऱ्या भागाचे दिग्दर्शन अमित राय हे करणार आहेत. चित्रपटाची कथा अंतिम झाल्याचे अमित राय यांनी सांगितले. ओ माय गॉड च्या पहिल्या भागामध्ये परेश रावलच्या अप्रतिम अभिनयाने हा चित्रपट आधीच लोकांच्या मनामध्ये बसला होता आणि आता याचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला येईल. परेश रावल यांना बदलून पंकज त्रिपाठी यांना मुख्य भूमिका दिल्याबद्दल पत्रकारांनी दिग्दर्शकांना प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले, पंकज त्रिपाठी देखील खूप चांगले अभिनेते आहेत. हल्लीच त्रिपाठी यांनी नेटफ्लिक्सला किंवा हल्लीच्या चित्रपटांमध्ये चांगल्या प्रकारच्या चारित्र्य भूमिका साकारल्या आहेत.

सप्टेंबर पासून सुरू होणार ओ माय गॉड भाग-२ चे शूटिंग

OMG2 PART

ओ माय गॉड या चित्रपटाचे पहिल्या भागाचे निर्माते उमेश शुक्ला होते. पण दुसर्‍या भागामध्ये अश्विन वर्धे आणि अक्षय कुमार हे दोघे मिळून या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटाचे  चित्रीकरण सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. आता खरोखरच अक्षय कुमार आणि पंकज ची त्रिपाठी या दोघांची जोडगोळी प्रेक्षकांना कशाप्रकारे खिळवून ठेवते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. सध्याच्या घडीला अक्षय कुमारकडे जवळपास दहा पेक्षा जास्ती चित्रपटांची भरमार आहे. यामध्ये सूर्यवंशी, बेलबॉटम, अतरंगी रे, पृथ्वीराज, बच्चन पांडे, रामसेतू, रक्षाबंधन अशा प्रकारच्या चित्रपटांची नावे समाविष्ट आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular