25.9 C
Ratnagiri
Monday, July 15, 2024

मुंबईला जगाची आर्थिक राजधानी बनविण्याचं माझं स्वप्नः नरेंद्र मोदी

लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी...

संगमेश्वरात एसटीतून चक्क छत्र्या उघडून करावा लागला प्रवास

शनिवारी संगमेश्वर ते कोंडये सोडण्यात आलेल्या एस....

मुंबईसह कोकणातही मुसळधार पावसाची बरसात…

मुंबई शहरासह उपनगरात आज सकाळपासूनच पावसाने दमदार...
HomeChiplunपरशुराम घाटात मातीचा भराव खचला काँक्रिटीकरणालाही तडे गेल्याने भीती

परशुराम घाटात मातीचा भराव खचला काँक्रिटीकरणालाही तडे गेल्याने भीती

पहिल्याच मुसळधार पावसाच्या तडाख्यानंतर परशुराम घाटात नव्याने करण्यात आलेल्या काँक्रिटीकरणाला तडे गेले असून घाटात टाकलेला मातीचा भरावदेखील खचत असल्याने प्रवाशांच्या पोटात भीतीचा गोळा उमटला आहे. मात्र खचलेल्या रस्त्याचा वाहतुकीला कोणताही धोका नसल्याचे महामार्ग विभागाचे म्हणणे आहे. चार दिवसांपूर्वी खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू झाला. सोमवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे परशुराम घाटात नव्याने करण्यात आलेल्या काँक्रिटीकरणाला तडे गेले आहेत. ५.४० किलोमीटर लांबीचा हा परशुराम घाट असून एका मार्गिकेचे (एक लेन) काम पूर्ण झाले आहे.

या घाटातील लांबीपैकी १.२० किलोमीटर लांबी ही उंच डोंगर रांगांमुळे सातत्याने महामार्गावर दरड किंवा माती स्वरूपात कोसळत असते. मागील आठवड्यातदेखील परशुराम घाटात महामार्गावर छोट्या-मोठ्या दरडी कोसळल्या होत्या. त्याची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी देखील केली होती. या साऱ्या पार्श्वभूमीवर सोमवारी घाटातील काँक्रिटीकरणाला तडे गेल्याचे दिसते आहे. १०० मीटरचे हे काँक्रिटीकरण नुकतेच करण्यात आले होते. त्यानंतर हा मार्ग वाहतुकीला खुला झाला. त्याच काँक्रिटीकरणाला तडे गेल्याने प्रवाशांच्या पोटात भीतीचा गोळा उमटला आहे.

घाटात रस्त्याला तडे गेले असल्या बाबत पेढेच्या सरपंच आरूषी शिंदे, उपसरपंच अष्टविनायक टेरवकर, ग्रामविकास अधिकारी नारायण कटरे, ग्रामस्थ बबन पडवेकर, बंटी शिंदे यांनी या भागाची पाहणी केली. दरम्यान, काँक्रिटीकरणाला तडे गेले असले तरी रस्ता व्यवस्थित असून खचलेल्या भरावामुळे वाहतुकीला कोणताही धोका नसल्याचे महामार्ग विभागाच्या महाड येथील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. पावसाळ्यानंतर खचलेल्या भागात काँक्रिटीकरण करण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular