27.2 C
Ratnagiri
Wednesday, October 4, 2023

जिल्ह्यात पावसाने २४ लाखांची हानी

सलग दोन दिवस वेगवान वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार...

रत्नागिरी मोर्चाने दणाणली, जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचा आक्रोश

जुनी पेन्शन लागू करा, शाळांचे खासगीकरण थांबवा,...
HomeChiplunचिपळूण इथे कचरा प्रकल्प रस्त्यावर कोसळली दरड

चिपळूण इथे कचरा प्रकल्प रस्त्यावर कोसळली दरड

शहरातील शिवाजीनगर येथील कचरा व्यवस्थापन प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रविवारी सकाळच्या सुमारास दरड कोसळली. माती, दगड आणि झाडेझुडपे रस्त्यावर येऊन मार्ग बंद झाला होता. त्यामुळे या प्रकल्पाकडे जाणाऱ्या नगरपालिकेच्या गाड्यांची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. याबाबत माहिती मिळताच चिपळूण नगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत ती दरड बाजूला केली. त्यानंतर तेथील वाहतूक सुरळीत झाली. गेल्या काही दिवसांपासून चिपळूण शहर व तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. रविवारीही पहाटेपासून संततधार सुरू होती. याचदरम्यान सकाळी शिवाजीनगर येथील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ते कचरा व्यवस्थापन प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अचानक दरड कोसळली. या वेळी वाहने नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

या दरडीतील माती, दगड व झाडे रस्त्यावर आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला होता. यामुळे कचरा प्रकल्पाच्या जागेत टाकण्यासाठी गाळ घेऊन जाणाऱ्या वाहनांचाही मार्ग बंद झाला. कचरा प्रकल्पातील कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर दरड कोसळल्याची माहिती चिपळूण नगरपालिका प्रशासनाला दिली. त्याची तातडीने दखल घेत मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी ती दरड बाजूला करण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. त्यानुसार प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे, अनंत मोरे, आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक महेश जाधव व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव देत जेसीबीच्या साहाय्याने ती दरड बाजूला केली व वाहतूक सुरळीत केली.

RELATED ARTICLES

Most Popular