31.3 C
Ratnagiri
Friday, May 24, 2024

दापोलीतील महिलेच्या मृत्यूचे गूढ वाढले, नातेवाईकांना घातपाताचा दाट संशय

तालुक्यातील वणंद येथील ५० वर्षीय महिलेच्या मृत्यूचे...

महावितरणला ५७२ कोटीचा प्रकल्प मंजूर

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण योजनेतून...

४ दिवस रत्नागिरीत पावसाचा इशारा

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी...
HomeInternationalफायजर आणि मॉडर्ना लस ९० टक्के परिणामकारक

फायजर आणि मॉडर्ना लस ९० टक्के परिणामकारक

अमेरिकेमध्ये झालेल्या या संशोधममध्ये प्राप्त झालेल्या अहवालानुसार या दोन्ही लसीचा पहिला डोस चांगलाच परिणामकारक ठरत असून, दोन डोसांमधील ठराविक अंतर ठरवण्यात आले आहे.

जगभरामध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्याचे संकेत दिसत असून जगभरातील कोरोना संक्रमिताच्या संख्येमध्ये देखील जास्त प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. विशेषत: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव भारतामध्येही मोठ्या प्रमाणात जाणवायला लागला असून कोरोनाग्रस्त सर्वाधिक रुग्ण प्रमाण महाराष्ट्रामध्ये आढळून आले आहेत. सर्वत्र लसीकरण मोहीम सुरु असूनही रुग्णांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसत आहे. पण याच दरम्यान नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार अमेरिकेच्या फायजर आणि मॉडर्ना या लसीसंदर्भातील बातमीने दिलासा मिळाला आहे.

अमेरिकेमध्ये झालेल्या या संशोधममध्ये प्राप्त झालेल्या अहवालानुसार या दोन्ही लसीचा पहिला डोस चांगलाच परिणामकारक ठरत असून, दोन डोसांमधील ठराविक अंतर ठरवण्यात आले आहे. पहिला डोस घेतल्यावर 15 दिवसांनी कोरोना संक्रमण होण्याची शक्यता 80 टक्केनी कमी होते. तर ठराविक कालावधीनंतर फायजर आणि मॉडर्ना या कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर अमेरिकेतील संशोधनानुसार 15 दिवसांनी कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह येण्याची शक्यता 90 टक्क्यानी वाढली आहे. अमेरिकेतील 4000 नागरिकांवर या लसीचा वापर करुन संशोधन अहवाल देण्यात आले आहेत. या 4 हजार रुग्णांमध्ये आरोग्य विभागातील फ्रंटलाईन वर्करचा समावेश असून, हे संशोधन यूस एस सेंटरर्स फॉर डीजीस कंट्रोल अँड प्रिवेशनद्वारे केले गेले आहे. वेगवेगळ्या लसींबाबत हजारो चर्चाना उधाण आलेले असून, लस कोरोना संक्रमणापासून वाचण्यासाठी किती प्रभावशाली आहे, या संशोधनाच्या माध्यमातून निश्चित करण्यात आले आहे. लसीकरणाचा आपला प्रयत्न यशस्वी होत असल्याचे या संशोधनातून दिसून येते, असे सीडीसीचे संचालक रोशल वेलेंस्की यांनी वक्तव्य केले. हे संशोधन 14 डिसेंबर 2020 से 13 मार्च 2021 या काळात करण्यात आले. या संशोधनाचे निष्कर्ष आणि अहवाल सोमवारी जाहिर करण्यात आले. या संशोधनासाठी दोन्ही कंपन्यांनी क्लिनीकल ट्रायल्सच्या डेटाही उपयोगात आणला. देशामध्ये पुण्यातील सीरम इंस्टीट्यूटची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही लस वापरत असल्याने, अद्याप भारतामध्ये फायजर आणि मॉडर्नाच्या लसीला मान्यता दिली गेलेली नाही.

Pfizer and Modern vaccines are 90 percent effective

सुरुवातीपासून अनेक लस निर्माण केल्या गेल्या, त्याच्यावर अनेक अनुभव, प्रतिक्रिया घेतल्या गेल्या. फायजरच्या लसीबाबत साधारण 3 महिने तरी संभ्रम अवस्था निर्माण झाली होती या लसीचे . फिनलँड आणि बुल्गारिया येथे समोर आलेले साइड इफेक्ट समोर आले. या लसीचे साईड इफेक्ट फिनलँड येथे 5 रुणांना देखील जाणवले होते. तसेच यापूर्वी देखील फ्रान्ससह जर्मनी, इटली 15 हून अधिक देशांनी अ‍एस्ट्राजेनेका लस वापरावर तात्पुरती बंदी घातलेली, जी आता अहवालानंतर मागे घेण्यात आली आहे. लसीकरण झालेल्या काही लोकांच्या शरीरात रक्त गोठणे म्हणजेच ब्लड क्लॉट निर्माण झाल्याची समस्या दिसून येत होती, असा या लसीवर बंदी घालण्यामागील दावा होता, परंतु, या लसीमुळेच झाले याचा ठोस पुरावा मिळू शकला नाही.

RELATED ARTICLES

Most Popular