27.2 C
Ratnagiri
Friday, May 9, 2025

रत्नागिरी लोहमार्ग पोलिस ठाण्यांना कुलूप

कोकणरेल्वे मार्गावरील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कोकण रेल्वेच्या...

वाशिष्ठीतील गाळासाठी ७० जणांचे अर्ज – स्वखर्चाने वाहतूक

चिपळूण शहरांमध्ये पुराचे पाणी भरते त्याला वाशिष्ठी...

जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांना बदल्यांचे वेध

जिल्हा परिषद व पंचायत झालेल्या अधिकारी, कर्मचान्यांना...
HomeRatnagiriअखेर “तो” आरोपी पोलिसांच्या ताब्यात

अखेर “तो” आरोपी पोलिसांच्या ताब्यात

खेड रेल्वे स्थानकात लाखोंची चोरी झाली होती. त्यामध्ये दत्तात्रयचाच हात असावा या संशयातून रेल्वे पोलिसांनी त्याला शनिवारी ता. १२ पहाटे अटक केली होती.

लघुशंकेला जाण्याच्या बहाण्याने रेल्वे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केलेल्या संशयिताला रेल्वे आणि शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने कल्याणमधून ताब्यात घातले आहे. मात्र बेडीसह पसार झालेल्या या संशयिताच्या हातात आता बेडी नाही. त्याने बेडी कुठे आणि कशी काढून टाकली, याचा शोध पोलिस घेत आहेत. तीन दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर रेल्वे आणि शहर पोलिसांनी आरोपी ताब्यात मिळाल्याने नि:श्वास सोडला आहे.

दत्तात्रय शिवाजी गोडसे रा. सोलापूर असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी खेड रेल्वे स्थानकात लाखोंची चोरी झाली होती. त्यामध्ये दत्तात्रयचाच हात असावा या संशयातून रेल्वे पोलिसांनी त्याला शनिवारी ता. १२ पहाटे अटक केली होती. त्यानंतर त्याला शहर पोलिसांच्या हवाली करण्यासाठी घेऊन गेले होते. त्याच्या हातात बेड्या घातलेल्या होत्या. परंतू तक्रार देण्यावरुन दुपारपर्यंत रेल्वे पोलिस आणि शहर पोलिस यांच्यात चर्चा सुरू असताना दत्तात्रयला शहर पोलिस स्थानकातच बसवून ठेवले होते.

काही वेळाने लघुशंकेला जाण्याच्या बहाण्याने दत्तात्रय रेल्वे पोलिसांच्या हातातून तुरी देऊन शौचालयातून पळून गेला. चोरटा हातावर तुरी देऊन पळाल्यानंतर रेल्वे पोलिसांसह शहर पोलिसांनी आपली यंत्रणा कामाला लावलेली होती. ही कारवाई शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक मनोज भोसले, उपनिरीक्षक शांताराम महाले, नितीन जाधव, प्रसाद घोसाळे, वैभव नार्वेकर, अमोल भोसले, आशिष भालेकर, वैभव शिवलकर यांच्यासह रेल्वे पोलिस निरीक्षक अजित मधाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल रोहिदास भालेकर, आशिष कुमार, शेळके, शरसाट आदींनी ही कारवाई केली. बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १९ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular