रत्नागिरी जिल्ह्यातील लांज्यामधील सध्या गाजत असलेले प्रकरण आणि विद्यार्थी आणि शिक्षकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटनेचा सर्वत्र निषेध केला जात आहे, फरार असलेल्या त्या गुन्हेगार मुख्याध्यापक सोनावणेच्या शोधामध्ये पोलीस आहेत. त्याची गाडी रत्नागिरी रेल्वेस्टेशनला दिसून आल्याने, तो रत्नागिरी सोडून कुठेतरी फरार झाल्याचे समजते.
सहावीतल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापक नथू सोनवणे याचा ठावठिकाणा लागत नसल्याने पोलिसांच्या पथकाने पुणे येथे जाऊन त्याच्या मुलाला ताब्यात घेतले आहे. काल २९ एप्रिल रोजी त्याला घेऊन लांजा पोलीसांचे पथक सायंकाळी लांजा येथे दाखल झाले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत त्याची चौकशी सुरू होती
सहावीतील विद्यार्थिनीवर अत्याचार करणारा मुख्याध्यापक नथू सोनवणे याच्यावर रविवारी २४ एप्रिल रोजी लांजा पोलिस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. मात्र गेल्या रविवारपासून तो बेपत्ता असल्याने पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. मात्र त्याचा मोबाईल स्विच ऑफ असल्याने त्याला पकडण्यासाठी पोलिसांना मोठी मेहनत घ्यावी लागत आहे. मोबाईल वरून लोकेशन ट्रेस करणे सोपे पडले असते परंतु, मोबाईल स्विच ऑफ केल्याने त्याचा शोध घेण्यास अडथळे येत आहेत.
या पार्श्वभूमीवर लांजा पोलिसांच्या पथकाने पुणे येथे जाऊन नथु सोनावणे याच्या मुलाला ताब्यात घेतले आहे. आता नथू सोनवणे याच्या मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याने नथु सोनवणे याचा ठावठिकाणा लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बाकी कोणाच्या संपर्कात नसला तरी तो आपल्या कुटुंबाच्या कुठून ना कुठून संपर्कात असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे त्याच्या मुलाकडून काही माहिती मिळते का याचा पोलीस शोध घेत आहेत.