25.7 C
Ratnagiri
Monday, September 8, 2025

जागा खरेदीसाठीही मिळणार घरकुल योजनेतंर्गत आर्थिक मदत

ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांकडे स्वतःची जमीन नसल्यामुळे...

पेट्रोल पंपाच्या कंपाऊंडची संरक्षक भिंत कोसळली; सीएनजीचा पुरवठा बंद

मंडणगड मधील एचपीसीएल कंपनीच्या नोबेल ऑटो पेट्रोल...

रत्नागिरी पॅसेंजरसाठी २ ऑक्टो. ला जल फाऊंडेशनचे लाक्षणिक उपोषण

कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या प्रलंबित मागण्यांकडे मध्य...
HomeChiplunमहामार्गावर पोलिस २४ तास 'जागते रहो'

महामार्गावर पोलिस २४ तास ‘जागते रहो’

महामार्गावरून वेगाने धावणाऱ्या वाहनांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार आहे.

गणेशोत्सव अवघ्या ३ दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाच महामार्ग आतापासून चाकरमान्यांच्या वर्दळीने गजबजू लागल्याने पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. त्यांच्या सुखकर प्रवासासाठी कशेडी येथे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. १६ सप्टेंबरपासून महामार्गावर उभारण्यात आलेल्या ४ विशेष कक्षांच्या ठिकाणी पोलिस २४ तास जागता पहारा ठेवणार आहेत. येथील सुविधा केंद्रांत चाकरमान्यांसाठी चहा-पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. चाकरमानी गावी येण्यास सुरवात  झाल्याने महामार्गावर वाहनांची वर्दळही सुरू झाली आहे.

महामार्गावर यंदाही खड्यांचे “विघ्न” कायमच असल्याने गणेशभक्तांना मनस्ताप सहन करत गाव गाठावे लागणार आहे. अपघात रोखण्याच्या दृष्टीने पोलिसांकडून विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ५ दिवसांपूर्वीच कशेडी बोगद्यातील मुंबईहून गोव्याकडे जाणारी एक मार्गिका हलक्या वाहनांसाठी खुली झाल्याने त्यांचा प्रवास वेगवान व आरामदायी होणार असला, तरी पोलादपूर हद्दीत भोगाव व तालुक्यातील खवटी येथील अनुसया हॉटेलजवळच्या बोगद्याच्या प्रवेशद्वारानजीक वाहतूक नियंत्रणासाठी गणेशोत्सव संपेपर्यंत पोलिसांची २४ तास गस्तही ठेवण्यात येणार आहे.

याशिवाय बोगद्यापासून ५०० मीटर अंतरावर अत्यावश्यक यंत्रसामग्रीची सुसज्जताही ठेवण्यात आली आहे. महामार्गावरून वेगाने धावणाऱ्या वाहनांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार असून, अशा वाहनांना वॉकीटॉकीद्वारे पोलिसांकडून संदेश गेल्यास केवळ ३ किमी अंतरावर अडवण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. ठिकठिकाणी चालक व वाहकांचे समुपदेशनही केले जाणार आहे.

चहा-पाण्याचीही असणार व्यवस्था – गणेशोत्सवासाठी गावी परतणाऱ्या चाकरमान्यांसाठी कशेडीसह अनुसया हॉटेल, भरणे येथील मध्यवर्ती ठिकाणी, जांबुर्डे येथील आबाचा ढाब्यानजीक विशेष पोलिस कक्षासह उभारलेल्या सुविधा केंद्रात चहा-पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular