26.4 C
Ratnagiri
Tuesday, June 24, 2025

रत्नागिरी नगरपरिषदेत सत्ता मिळविण्यासाठी राजकीय डावपेच…

रत्नागिरी नगर परिषद निवडणूकीचे मतलई वारे आता...

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरच्या चौकशीचे आदेश…

खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथे नुकत्याच दहावी...

चिपळूण-कऱ्हाड मार्ग अवजड वाहनांसाठी बंदच…

कोयना ते पाटणदरम्यानच्या पुलाचे बांधकाम सुरू असताना...
HomeKhedशिवसेना-मनसेत राजकीय कोपरखळ्या...

शिवसेना-मनसेत राजकीय कोपरखळ्या…

माजी आमदार संजय कदम यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला.

शहरातील शिवसेना व मनसेतील राजकीय संघर्षासह आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आणि प्रत्येक निवडणुकीतील एकमेकांवरील कुरघोडीच्या राजकारणाची राजकीय पटलावर नोंद झाली आहे. शिमगोत्सवानिमित सहाणेवर शिवसेना व मनसे यांच्यात रंगलेल्या राजकीय जुगलबंदीत आगामी राजकारणावर भाष्य करताना एकमेकांचे काढलेले राजकीय वाभाडे चर्चेचा विषय ठरले आहेत. या जुगलबंदीत मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर व शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय मोदी यांनी केलेल्या अप्रतिम ढोलवादनाने सारे मंत्रमुग्ध झाले. तालुक्यात शिवसेना व मनसे यांच्यातील राजकीय वैर टिपेला पोहोचले आहे. शिवसेना व मनसेतील राजकीय संघर्षासह अनेक नाट्यमय घडामोडी आजही घडत आहेत. यापूर्वी माजी आमदार संजय कदम व मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांची गट्टी जमली होती; मात्र काही दिवसांपूर्वीच माजी आमदार संजय कदम यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे येथील राजकारण ढवळून निघाले आहे.

या पार्श्वभूमीवर शिमगोत्सवानिमित्त सहाणेवर शिवसेना व मनसे यांच्यात रंगलेल्या गंमतीशीर व भविष्यातील राजकारणाचा वेध घेणाऱ्या जुगलबंदीने पुन्हा एकदा राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. ‘भाऊ’ आले आता तुम्हीही याना, अशी साद शिवसेनेने घालताच कोटीची कोटी करत वैभव खेडेकर यांनी नकार दर्शवला. याला प्रत्युत्तर देताना माजी नगरसेवक मिनार चिखले यांनी तुम्ही येऊ नका, फक्त मैत्री करा, असा सल्ला दिला. या सल्ल्यानंतर खेडेकर यांनी चिखले यांच्या महत्त्वाकांक्षेवर बोट ठेवले. नाव घे, नाव घे असा सूर शिवसेनेच्या गोटातून आळवताच शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय मोदी यांनी तितक्याच जोशात ढोलवादन करत शिंदे गटातून नगराध्यक्ष होतील वैभव खेडेकर, अशा घोषणा देताच हशाच पिकला. यानंतरही वैभव खेडेकर यांनी ते नंतर पाहू, असे सांगितले. २०२९ मध्ये धनुष्यबाणच जाईल आणि शिवसेनेच्या हाती ‘कमळ’ फुलेल अशी कोपरखळी मारली. या दरम्यान, वैभव खेडेकर व संजय मोदी यांच्या अप्रतिम ढोलवादनानेही साऱ्यांचेच लक्ष वेधले. या प्रसंगी शिवसेना व मनसेतील कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular