26.4 C
Ratnagiri
Friday, October 18, 2024

अखिल शेओरानचे लक्ष्य कांस्यपदक, दुसरे पदक भारताच्या झोळीत

ISSF विश्वचषक फायनल भारताची राजधानी नवी दिल्ली...

महिला मतदार ठरवणार दापोलीचा आमदार दापोली मतदारसंघ

विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून, सर्वांनी आचारसंहितेचे...
HomeRatnagiriसुमार दर्जाची रत्नागिरी-मुंबई एसटी बस प्रवाशांनी रोखली - आ.साळवी

सुमार दर्जाची रत्नागिरी-मुंबई एसटी बस प्रवाशांनी रोखली – आ.साळवी

रत्नागिरीतून मुंबईकडे जाणारी एसटी बस व्यवस्थित नसल्याचे लक्षात आल्यानंतर प्रवाशांनी गाडी बदलण्याची मागणी केली; मात्र एसटीच्या अधिकाऱ्यांनी नकारघंटा वाजवली. हा विषय शिवसेनेचे शाखाप्रमुख कल्पेश सुर्वे यांनी आमदार डॉ. राजन साळवींपुढे मांडला. त्यांनी प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी आगारप्रमुखांकडे धाव घेत प्रश्न मार्गी लावला. शासनाने एस.टी.च्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी अनेक उपक्रम राबवत प्रवाशांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अनेक योजना अंमलात आणल्या. त्यामध्ये लांब पल्ल्याच्या दर्जेदार गाड्या सुरू केल्या. त्यानुसार रत्नागिरी आगारातनही अनके बसेस लांब पल्ल्याच्या सुरु केल्या आहेत. त्यामध्ये रत्नागिरी-मुंबई ही बस सुरू केली आहे. महत्वाचे म्हणजे या गाडीला प्रवाशांची मोठी पसंती आणि अग्रक्रम असतानाही रत्नागिरी एस. टी. विभागाने रत्नागिरीहुन मुंबईला जाण्यासाठी अत्यंत निकृष्ट दर्जाची बस दिली.

या बसमध्ये ना बसायला आसने चांगली नव्हते, ना खिडक्या, ना गियर, ना पिकअप, ना अद्यायवतीकरणं. प्रवाशांना फार मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार होते. हे लक्षात घेवुन – गाडीतील रत्नागिरीहुन बसलेल्या आणि मूळच्या मिऱ्या गावच्या रहिवाशी असणाऱ्या साक्षी पेडणेकर यांनी जोरदार आक्षेप घेतला. जोपर्यंत  सुस्थितीत आणि चांगल्या दर्जाची बस प्रवासासाठी उपलब्ध होणार नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत या गाडीतून प्रवास करायला त्यांनी नकार दिला. त्यांच्या या मागणीला गाडीच्या दुरावस्थेला कंटाळलेल्या सर्वच प्रवाशांनी समर्थन देत गाडी पुढे जाऊ देण्यास नकार दिला. त्यामुळे बराच वेळ गाडी एकच ठिकाणी उभी होती. चालक जहीर शेख आणि वाहक प्रशांत लबडे यांनी बस आगार प्रमुखांशी चर्चा केली. मात्र त्यांनीही नकारात्मक भूमिका घेतल्याने बस एकच ठिकाणी ताटकळत उभी होती.

त्याचवेळी साक्षी पेडणेकर यांनी आपले मामा तथा रत्नागिरी तालुक्यातील शिवसेनेचे गणपतीपुळें शाखा प्रमुख कल्पेश सुर्वे यांना कल्पना’ दिली. त्यांनी लोकांच्या गैरसोयीची दखल घेत लांजा-राजापुर विधानसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार डॉ. राजन साळवी यांचे स्वीय सहाय्यक सुभाष मालप यांच्याशी संपर्क साधून सदर एस. टी. प्रशासनाच्या गलथानपणाची माहिती दिली. यावेळी आमदार डॉ. राजन साळवी यांनी दखल घेत प्रवाशांना होणारी गैरसोय दूर करण्यासाठी तात्काळ रत्नागिरी आगारात धाव घेतली. यावेळी आ. साळवी यांनी एस.टी. प्रशासनाच्या गलथानपणाचा खरपूस समाचार घेतला. प्रशासनला आपल्या शिवसेना स्टाईलमध्ये सम जावत रत्नागिरी- मुंबई प्रवासासाठी नवी गाडी देण्याची सूचना केली. शेवटी नवी देत गाडी प्रशासनाने मार्ग मोकळा केला.

RELATED ARTICLES

Most Popular