तब्बल २३ हजार ९४३ कासवांच्या अंड्यांचे संरक्षण

86
Preservation of turtle eggs

तालुक्यातील माडबन, वेत्येसह लगतच्या रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड, गावखडी सागरीकिनाऱ्यावर दुर्मिळ मानल्या जात असलेल्या ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या समुद्र कासवाची मादी गेल्या काही वर्षांपासून अंडी घालण्यासाठी येते. त्यातून, या समुद्रकिनाऱ्यावरील ही चारही ठिकाणे ऑलिव्ह रिडले कासवांसाठी ‘सेफ झोन’ ठरली असून या समुद्र किनाऱ्यावर यावर्षी २३१ घरट्यांमध्ये २३ हजार ९४३ अंडी घातली आहेत. त्यातून ९ हजार २१० कासवाची पिल्ले बाहेर पडून त्यांचा समुद्रातील जीवनप्रवास सुरू झाला आहे.

जंगली श्वापदापासून कासवांच्या समुद्रप्रवास सुखकर व्हावा म्हणून अंड्यांचे संरक्षण करण्यासह त्यांचा विभागीय वनाधिकारी दीपक खाडे, सहाय्यक वनरक्षक सचिन निलख यांच्या नेतृत्वाखाली आणि वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूरचे वनपाल सदानंद घाडगे, न्हानू गावडे, वनरक्षक सूरज तेली, प्रभू साबणे, शर्वरी कदम यांच्यासह वेत्ये येथील कासवमित्र गोकुळ जाधव, मितेश जाधव, माडबन येथील शामसुंदर गवाणकर, नंदलाल जाधव, गावखडी येथील प्रदीप डिंगणकर, वेदांत पाटील, मालगुंड येथील ऋषिराज जोशी, रोहित खेडेकर आदी मेहनत घेत आहेत. वेत्ये येथे १ हजार ९४०, माडबन किनारपट्टीवर २ हजार २१८, गावखडी येथे १८ हजार ७३३, मालगुंड येथे १ हजार ५२ अशी २३१ घरट्यांमध्ये २३ हजार ९४३ अंडी घातली आहेत. त्यामधून आजपर्यंत ९ हजार २१० पिल्ले बाहेर येऊन त्यांचा समुद्र जीवनप्रवास सुरू झाला आहे.