26.4 C
Ratnagiri
Monday, June 23, 2025

रत्नागिरी नगरपरिषदेत सत्ता मिळविण्यासाठी राजकीय डावपेच…

रत्नागिरी नगर परिषद निवडणूकीचे मतलई वारे आता...

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरच्या चौकशीचे आदेश…

खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथे नुकत्याच दहावी...

चिपळूण-कऱ्हाड मार्ग अवजड वाहनांसाठी बंदच…

कोयना ते पाटणदरम्यानच्या पुलाचे बांधकाम सुरू असताना...
HomeRatnagiriहातखंबा येथे दोन ट्रक एकमेकांवर धडकले

हातखंबा येथे दोन ट्रक एकमेकांवर धडकले

सायंकाळी हातखंबा येथील अवघड वळणावरील पुलावर दोन्ही ट्रकची समोरासमोर टक्कर झाली. 

मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा गावात. पुलाजवळ दोन ट्रकची बुधवारी सायंकाळी समोरासमोर धडक होऊन त्यातील एका ट्रकचा चालक ठार झाला. अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहे. सायंकाळी ६.४५ हा अपघात झाला. त्यामुळे वाहतूक थांबली. दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काहीकाळ बंद ठेवण्यात आली होती. या अपघाताविषयी पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आयशर टेम्पो हा कोल्हापूरहून रत्नागिरीकडे चालला होता. याचवेळी सोळा चाकी ट्रक रत्नागिरीच्या दिशेने धावत होता. सायंकाळी हातखंबा येथील अवघड वळणावरील पुलावर दोन्ही ट्रकची समोरासमोर टक्कर झाली.

या अपघातात एका चालकाचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. अपघातस्थळी नरेंद्राचार्याजी महाराज संस्थानची रुग्णवाहिका तत्काळ मदतीसाठी दाखल झाली होती.अपघातस्थळी लोकांनी गर्दी केली होती. अपघाताने महामार्गावरील वाहतूक पूर्ण थांबली. त्यामुळे दोन्ही बाजूनी लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. ग्रामीण पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली. पोलीस व स्थानिक तरुणांनी दोन्ही ट्रकमधील चालकांना बाहेर काढले. जखमींना रुग्णवाहिकेतून रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी पंचनामा करून वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली.

RELATED ARTICLES

Most Popular